महाराष्ट्र

Badlapur Case : शाळेच्या ट्रस्टींचा चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग ?

High Court : बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट; मानवी तस्करीत सहभाग असल्याची याचिका

मुंबईतील बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. बदलापूर अत्याचार घटनेचा गुन्हा नोंद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली गेली. सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका एका आरटीआय कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी स्वसंरक्षणात ठार केले. त्याच्या एन्काऊंटरनंतर शाळेच्या ट्रस्टींचा मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग असल्याची बाब पुढे आली आहे. अर्थात यासंदर्भात गंभीर आरोप करत प्रकरणाचा तपास तातडीने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करा, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या वडिलांच्या वतीने अॅड. कटारनवरे यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. याची दखल खंडपीठाने घेत आधी याचिका दाखल करा, असा सल्ला देत बुधवारी सुनावणी घेण्याची हमी दिली.

Shiv Sena : उद्धव ठाकरेंवर बोलण्याऐवजी स्वत:च्या मुलावर बोला!

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी घुसून तो जागीच ठार झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. ट्रस्टी आणि सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारीही अद्याप फरार आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आणि एसआयटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने संपूर्ण तपास तातडीने सीबीआयकडे वर्ग करा, अशी विनंती याचिकेत केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!