प्रशासन

ACB Trap : चांदूरबाजारच्या तहसीलदार गरड एसीबीच्या जाळ्यात

Corruption : अमरावती महसूल विभागाला भ्रष्टाचाराची कीड

Amravati District : अमरावती जिल्ह्यातील महसूल विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागलेली दिसते. एका तहसीलदाराला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. आता जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह एका लिपिकावर लाचलुचपत विरोधी पथकाने कारवाई केली आहे.

भ्रष्टाचाराच्या घटनेचा भंदाफोड..

अमरावती जिल्ह्यात महसूल विभागात भ्रष्टाचाराच्या घटना समोर येत आहेत. भ्रष्टाचाराचा भंडाफोड सुरुच आहे. अमरावती शहराचे तहसीलदार विजय लोखंडे यांना एका ले-आऊट प्रकरणात निलंबित केले. त्यानंतर आज चांदूर बाजारच्या तहसीलदार गीतांजली नामदेवराव गरड यांच्यासह लिपिक किरण बेलसरे यांना लाच प्रकरणी अमरावतीच्या लाचलुचपतविरोधी पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 28 मार्च रोजी तक्रारदाराला त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतीचे वाटणीपत्रानुसार फेरफार करणे बाबतचा आदेश काढून हवा होता. चांदूर बाजार तहसील कार्यालयाचा लिपिक किरण बेलसरे, याने स्वतः करिता आणि तहसीलदार गरड यांच्याकरीता 25 हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचा आरोप केला आहे.

या तक्रारीवरुन 28 मार्च 24 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान किरण बेलसरे यांनी तडजोडीअंती 20,000/- रुपये लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच 8 मे 24 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान गीतांजली गरड, तहसीलदार, चांदूर बाजार यांचेसह किरण बेलसरे यांना लाच देण्यास प्रोत्साहन असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे दोन्ही आरोपीविरुध्द पोलिस स्टेशन चांदूर बाजार येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक मारुती जगताप, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अनिल पवार, अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक मिलींदकुमार बहाकर, मंगेश मोहोड आदींनी ही कारवाई केली आहे.

Vanchit Aghadi : साजीद खान पठाण यांना फरार घोषित करा

नायब तहसीलदार असताना गरड यांना अटक

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने बनावट आदेश बनविले असल्याचे माहिती असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन नायब तहसीलदार गीतांजली गरड यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. शिरुर तालुक्यातील 60 एकराहून अधिक शासकीय जमीनीचे बेकायदा हस्तातंरण करण्यात आले. त्यासाठी कागदपत्रांची फेरफार करण्यात आली. यामागे एक रॅकेट कार्यरत होते. त्याविषयी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे तक्रारीदेखील केल्या होत्या पण त्यांची दखल घेण्यात आली नसल्याने त्यांना अटक करण्यात आली होती

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!