महाराष्ट्र

Shiv Sena : उद्धव ठाकरे म्हणजे ‘शोले’मधील जेलर!

Uddhav Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे यांची कोटी; उद्धव यांचे हाल बघवत नाहीत

Political war : उद्धव ठाकरेंची स्थिती वाईट आहेत. त्यांचे हाल मला बघवत नाहीत. त्यांची अवस्था ‘शोले’ सिनेमातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर आधे उधर. त्यांच्या मागे कोणी शिल्लक राहिलेले नाही, अशी खोचक कोटी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मतदार यादीमधील घोळावरून सरकारवर टीका केली होती. त्याला बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे सध्या ‘कोई लौटा दे मेरे बिते हुये दिन’ असं म्हणत असतील. त्यांची अवस्था तशीच झाली आहे. मला त्यांची कीव येते. पराभव समोर दिसत असल्यामुळे मतदार यादीला दोष देत आहेत. विजयाची शाश्वती त्यांना नाही. त्यामुळे मतदारयादीचा जावई शोध त्यांनी लावला आहे.’ यावेळी संजय राऊत यांना वेड लागलं आहे, असंही ते म्हणाले.

आपापली यादी घोषित करू

महायुतीच्या बैठका रोज सुरू आहेत. जागावाटप आणि उमेदवारीवर निर्णय झाल्यानंतर तिन्ही पक्ष आपापली नावे घोषित करतील. पण जोपर्यंत पूर्ण जागा स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत बैठका सुरू राहतील, असं बावनकुळे म्हणाले. केंद्रीय संसदीय समितीकडे आम्ही आपलं म्हणणं मांडलं आहे. संसदीय मंडळ लवकरच जागावाटपावर निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.

सब कुछ प्रसिद्धीसाठी 

महाविकास आघाडीमध्ये केवळ भाजपला विरोध करण्यासाठी सगळे पक्ष एकत्र आले आहेत. यांच्याकडे विकासाचा कुठलाही अजेंडा नाही. त्यांना फक्त वाद निर्माण करायचे आहेत, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. महायुती केंद्र आणि राज्यात विकासासाठी काम करत आहे. पण महाविकास आघाडी ‘फेक नरेटिव्ह’ सेट करण्यासाठी आणि मीडियाची जागा घेण्यासाठी बोलत असते. त्यांच्याकडे राष्ट्रीय विचार नाही, असंही बावनकुळे म्हणाले.

संजय राऊत यांच्या तोंडाच्या वाफा

संजय राऊत यांना दिवसभर मीडियाची स्पेस घ्यायची असते. संजय राऊत यांच्या केवळ तोंडाच्या वाफा आहेत. आता मतदारयादीचा माहोल तयार केला आहे. आमच्या अनेक चांगल्या योजना आहेत. त्यामुळे मतदार आम्हाला मत देतील पण लाडकी बहीण योजना बंद करणाऱ्यांना मतदान करणार नाहीत, असं बावनकुळे म्हणाले.

Assembly Election : बावनकुळेंची दमदार एन्ट्री; कामठीतून पुन्हा मैदानात

गडकरी संपूर्ण प्रचारात

शनिवारी सायंकाळी नितीन गडकरींच्या घरी फडणवीस आणि बावनकुळे यांची बैठक झाली. या बैठकीत काही आमदारही उपस्थित होते. यासंदर्भात बावनकुळे म्हणाले, ‘नितीन गडकरी यांच्याशी विदर्भ आणि महाराष्ट्रातील काही जागांसंदर्भात दोन अडीच तास चर्चा झाली. संपूर्ण प्रचारात ते सहभागी राहतील.’

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!