महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : ‘या’मुळे बावनकुळेंना आहे विजयाची खात्री !

Lok Sabha Election : जाहीर सभांपेक्षा बैठकांवर होता भर, कारण

BJP : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात एक ऊर्जावान मंत्री म्हणून ओळखले जात होते. त्यानंतरही त्यांनी ती ऊर्जा कधी कमी होऊ दिली नाही. त्याचा परिचय त्यांनी या निवडणुकीतही दिला. तब्बल १४७ बैठका, ८६ निवडणूक नियोजन बैठका आणि एकूण ६९ जाहीर सभा घेत त्यांनी धूम उडवून दिली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात संघटन नियोजन आणि प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास केला. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बावनकुळे यांचा संघटना कार्य म्हणून हा सलग दुसरा राज्य प्रवास होता. निवडणूक प्रचारकाळात बावनकुळे यांच्या दौऱ्याचे नियोजन निवडणूक टप्प्यांच्या आधारे करण्यात आले होते.

विदर्भातील पहिल्या टप्प्यापासून ते नुकत्याच झालेल्या मुंबई आणि परिसरातील शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी जाहीर सभा आणि निवडणूक नियोजनाच्या बैठकांचा सपाटा लावला होता. नियोजनबद्ध पद्धतीने बैठका घेऊन त्या-त्या वेळी योग्य रमनिती ठरवली गेली. त्यामुळेच या निवडणुकीत त्यांना विजयाची खात्री आहे.

समर्थकांवर विश्वास

‘संपर्क से समर्थन’ या धोरणावर प्रगाढ विश्वास असणाऱ्या बावनकुळेंनी प्रचारादरम्यानही कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि मतदारांना आवाहन, अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या काळात जाहीर सभांबरोबरच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सुपर वॉरियर्स, शक्तिकेंद्र प्रमूख, बूथप्रमुख यांच्यासाठी मार्गदर्शनपर नमो संवाद सभा घेण्यावर भर दिला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्चला देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्या दिवशी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राज्य भाजपच्या निवडणूक नियोजन समितीची बैठक बोलावली. तेव्हापासून सुरू झालेला प्रचाराचा हा प्रवास निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदारसंघांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अर्थात १८ मे रोजी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला येथे घेतलेल्या सभेपर्यंत चालला.

या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महादेव जानकर , सदाभाऊ खोत, प्रा. जोगेंद्र कवाडे, विनय कोरे यांच्याबरोबर सभांमध्ये सहभाग घेतला.

कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक

निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारकाळात ते मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित लोकसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची (कोअर कमिटी) बैठक घेऊन त्यात निवडणूक व्यवस्थापना विषयी माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना करत असत. महाराष्ट्रातील निवडणूक झाल्यानंतरही ‘कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक…’ झाल्याचे पत्र लिहीले, त्याची भरपूर चर्चा झाली.

Uddhav Thackeray : ..तर उद्धव ठाकरेंना विजयाची खात्री आली कुठून ?

संघटन आणि संवाद हे भाजपच्या यशाचे सूत्र आहे. कार्यकर्ता या रचनेचा पाया. माझ्या महाराष्ट्र प्रवासात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही संघटन नियोजन आणि संवादावर भर दिला. यामध्ये आमचे प्रभारी दिनेश शर्मा, सहप्रभारी निर्मलकुमार सुराना, जयभान सिंग पवैय्या यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले. महायुतीतील घटकपक्षांशी समन्वय साधून आम्ही नियोजन केले, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना दिली

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!