महाराष्ट्र

Lok Sabha Election : चंद्रपुरातून सीएनजीचे उत्सर्जन शक्य

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला ठाम विश्वास 

Rajura : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूचे साठे आहेत. भूगर्भातून हा वायू बाहेर काढण्यासाठी आता वनविभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही. भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातून नैसर्गिक वायूचे साठी मिळू शकतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजुरा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूचे साठे आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर कोळसाही उपलब्ध आहे. पूर्व विदर्भामध्ये देशातील सर्वोत्तम दर्जाचे लोह खनिज आहे. ही सर्व नैसर्गिक साधन संपत्ती पाहता आगामी काळात येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होऊ शकते. या सर्व गुंतवणुकीचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो.

Lok Sabha Election : जातीच्या नव्हे विकासाच्या आधारावर मतदान करा

शेती उत्पादनातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जैवइंधन तयार केल्यास आयात कराव्या लागणाऱ्या कच्च्या तेलाचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे गडकरी म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जैवइंधन तयार करण्यासाठी आधुनिक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्याकडे आतापर्यंत केवळ अन्नदाता म्हणून पाहिले जात होते. परंतु आता शेतकरी ऊर्जादाता देखील झाला आहे. देशातील अनेक भागांमध्ये पर्यावरण पूरक इंधनावर चालणारी वाहने धावत आहेत. भविष्यात अशा वाहनांची संख्या वाढणार आहे. अशा वाहनांना लागणारे इंधन शेतीतून मिळवता येऊ शकते, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

पर्यावरण पूरक दिनावर भर देताना जलसंधारणाची कामे वाढली पाहिजे. वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी गावागावांमध्ये प्रयत्न झाल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल. भूजल पातळी वाढल्याने पर्यावरणासाठीही पोषक वातावरण तयार होईल, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नैसर्गिक साधन संपत्तीवर भर दिला गेल्यास एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेती आणि शेतकरी समृद्ध होतील. त्यातून विदर्भाची विदारक चित्र बदलेल, असा ठाम विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

भाजपचे ध्येय काय?

देशभरात शनिवारी (ता. 6) भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. भाजपच्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत झालेल्या बदलांचे वर्णन नितीन गडकरी यांनी केले. भाजपसाठी राष्ट्रहित सर्वतोपरी असल्याचे ठाम प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!