Political News टीडीपी सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते चौथ्यांदा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी चंद्राबाबू नायडू यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. चंद्राबाबू नायडूंसोबत पवन कल्याण यांनीही शपथ घेतली आहे. नव्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्रीपद सांभाळतील. चंद्राबाबू नायडू यापूर्वी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिठी मारून त्यांचे अभिनंदन केल्याने त्याचीच चर्चा सुरू आहे.
Congress Leaders : इकडे काँग्रेस, तर तिकडे पुतणे डॉ. आशिष देशमुख !
दिग्गज नेते उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, इतर केंद्रीय मंत्री, एनडीए नेते आणि काही राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मंगळवारी रात्री उशिरा अमरावती येथील निवासस्थानी अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नायडू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला अंतिम रूप दिले.
मुलगाही मंत्रिमंडळात
नायडू यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा मुलगा आणि टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश, प्रदेशाध्यक्ष के. अचन्नैडू आणि जनसेना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष नदेंदला मनोहर. टीडीपीच्या मंत्र्यांमध्ये 17 नवे चेहरे आहेत. उर्वरित 3 जण यापूर्वीही मंत्री होते.पवन कल्याण, नदेंदला मनोहर आणि कंदुला दुर्गेश हे जनसेना पक्षाचे तीन मंत्री आहेत. सत्य कुमार यादव हे एकमेव भाजप आमदार आहेत जे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळात तीन महिला आहेत. ज्येष्ठ नेते एन मोहम्मद फारूख नेत्यांचा समावेश आहे.
मंत्र्यांच्या यादीत आठ मागासवर्गीय, तीन अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीचा समावेश आहे. नायडू यांनी कम्मा आणि कापू समाजातील प्रत्येकी चार मंत्र्यांचा समावेश केला आहे. रेड्डीमधील तीन आणि वैश्य समाजातील एकाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे