महाराष्ट्र

Lok Sabha Election : काँग्रेसची रोजगार हमी,शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही अर्धा आम्ही!

Nitin Gadkari : काँग्रेसच्या काळात भंडारा जिल्ह्यात सर्वात बोगस शाळा-नितीन गडकरी

Bhandara Gondia  constituency : आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी परिचित असलेले केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्री   तथा भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात गौप्यस्फ़ोट केला आहे. काँग्रेसच्या काळात भंडारा जिल्ह्यात सर्वात जास्त बोगस शाळा तयार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावेळी शाळा म्हणजे काँग्रेसची रोजगार हमी असून शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही अर्धा आम्ही! या तत्वावर या बोगस शाळा काँग्रेसने दिल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला आहे.ते भंडाऱ्याच्या मोहाडीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांचा प्रचारासाठी आल्यावर झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. भाजप उमेदवार विद्यमान खासदारा सुनील मेंढे यांचा प्रचारासाठी स्टार प्रचारकांची सभा-दौरे वाढले आहे.आज (7 मार्च) केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची मोहाडीत प्रचार सभा झाली.

Lok Sabha Election : जातीच्या नव्हे विकासाच्या आधारावर मतदान करा

या सभेत गडकरी यांचे फटकेबाज भाषण चर्चेत आले आहे. नितीन गडकरी म्हणाले की,भविष्यात नागपूर हे विमानातील इंधनाचे मोठे सप्लायर शहर बनणार आहे. भविष्यात नागपुरात मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या इंधन भरण्यासाठी थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण दिलेला शब्द केवळ आश्वासन नसून निश्चित होणारे ‘काम’ आहे असे गडकरी म्हणाले. यावेळी एक तरी ‘माय का लाल’दाखवून द्या! ज्याला मी हे काम करतोय असे बोललो आणि ते काम झाले नाही असे आव्हान दिले आहे.मी लोकांना चुतीया बनवण्याचे काम करत नाही असेही गडकरी म्हणाले. आपण केवळ 10 टक्के राजकारण करत असून उरलेले 90% समाजकारण करत असल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी जातीपातीच्या राजकारणाचा तीव्र निषेध केला असून जो कोणी उमेदवार जातीचे राजकारण करेल त्याला मतदार लाथा देतील असेही गडकरी म्हणाले आहे.

काँग्रेसची पोलखोल

त्यांनी प्रचार भाषणात तत्कालीन काँग्रेस पक्षाची पोलखोल केली आहे. आपण विरोधी पक्षात असताना काँग्रेसने भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक बोगस शाळा दिल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. इंदिरा गांधी, संजय गांधी आणि राजीव गांधीचे नाव घ्या आणि देशी दारूचे लायसन मिळवा अशी पद्धत त्याकाळी असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. आता हेच लोक शाहू, फुले,आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. ते मोहाडीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील मेंढे यांच्या प्रचारा दरम्यान आल्यावर बोलत होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!