New Mantralay : केंद्र सरकारने संसद भवनाचे रुपांतर सेंट्रल व्हिस्टामध्ये केले आहे. त्यात धर्तीवर महाराष्ट्रातील मंत्रालयाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. लवकरच महाराष्ट्रात महाव्हिस्टा इमारत उभारण्यात येणार आहे. मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आणि त्या रिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे. या आराखड्यासाठी जागतिक पातळीवर निविदा काढण्यात आल्या आहेत. मुंबईत मंत्रालयाची भव्यदिव्य इमारत आहे. मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, सचिव यांचे कार्यालय याच इमारतीत आहेत. राज्याचे महत्वाचे निर्णय याच मंत्रालयातून होतात.
मंत्रालयाच्या सध्याच्या इमारतीचा पुर्नविकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्रालयाची मुख्य इमारत, विस्तारित इमारत तसेच आकाशवाणी, आमदार निवास, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले, महात्मा गांधी गार्डन, शासकीय निवासस्थाने अशा सगळ्यांचाच पुनर्विकास यानिमित्ताने करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मंत्रालय आणि परिसराच्या पुनर्विकाची कल्पना मांडली. त्यानंतर जुलै 2022 मध्ये राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने मंत्रालयाच्या पुनर्विकासाच्या प्रास्तावाला वेग दिला.
प्रस्ताव मागविले
मंत्रालयाचा मेकओव्हर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) विभागाने 5 ऑगस्ट 2024 रोजी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संपूर्ण विधानभवन परिसराचा पुनर्विकास करण्याची घोषणा केली होती. मात्र मंत्रालयाच्या पुनर्विकासाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यासंदर्भात चर्चा झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागविलेल्या निविदांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईतील मंत्रालयाला 21 जून 2012 मध्ये मोठी आग लागली होती. यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. 20 लोक जखमी झाले होते. या आगीत अनेक महत्वाच्या फाइल्स खाक झाल्या होत्या. पुन्हा 9 मार्च 2013 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मंत्रालयातील चवथ्या मजल्यावर आग लागली होती. त्यानंतर मंत्रालयाच्या पुनर्विकासाची चर्चा सुरू झाली होती. सध्याच्या मंत्रालयाच्या इमतारची उभारणी 1955 मध्ये करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांची वाढती संख्या पाहता या इमारतीत एनेक्सी भवन उभारण्यात आले आहे. अतिरिक्त विभागांना समायोजित करण्यासाठी 19 मजल्यांच्या नव्या प्रशासकीय इमारतीचीही उभारणी करण्यात आली. मात्र आता या संपूर्ण परिसराचा पुनर्विकास होण्याची शक्यता आहे.