महाराष्ट्र

Badlapur Case : शाळेचे सीसीटीव्ही फुटेज गायब

Deepak Kesarkar : शालेय शिक्षणमंत्री म्हणाले पोलिस तपास करणार

Sexual Assault : मुंबईतील बदलापूर येथील मुलींच्या लैंगिक छळप्रकरणी महिला व बालविकास विभागाने आपला तपास अहवाल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना सादर केला आहे. महिला व बालविकास विभागाने आपल्या अहवालात अनेक सूचना केल्या आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी (ता. 26) सांगितले की, बदलापूर शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहे. पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

शाळेतील मुलींच्या लैंगिक छळानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 20 ऑगस्टला ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे सेवा दहा तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. पोलिसांवर या प्रकरणात निष्काळजीपणाचा आरोप आहे. ज्यामध्ये पीडितेच्या पालकांना गुन्हा नोंदविण्यापूर्वी अनेक तास ताटकळत ठेवण्यात आले होते.

अहवाल मागविला

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना सांगितले की, शालेय शिक्षण विभागाने या घटनेबाबत अहवाल मागविला होता. 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचे आढळले आहे. हे फुटेज कसे गायब झाले, याचा शोध घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. गुन्हा प्रसाधन गृहाजवळ घडला आहे. त्यामुळे आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितले. त्यानंतर ते गायब झाल्याचे समितीला सांगण्यात आले. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगही अहवाल सादर करणार आहे.

Kolkata Rape Case : आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी यांनी 23 ऑगस्टला बदलापूर शहराला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पोलिस, महसूल, वैद्यकीय अधिकारी, शिक्षण मंडळ, निलंबित मुख्याध्यापिका, पालकांशी चर्चा केली. आयोगाच्या सदस्यांनी वैयक्तिक चौकशीही केली. 25 ऑगस्टला आयोग आणखी काही संबंधित पक्षांची चौकशी करून सविस्तर तपास अहवाल केंद्र सरकारला पाठवणार आहे.

बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. आरोपीला कठोर शिक्षा करण्यात येईल. यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्यांबाबतही त्यांनी निर्देश दिलेत. विद्यार्थी किंवा पालकांना अडचण येत असल्यास प्रत्येक शाळेत तक्रार पेटी लावावी, अशी सूचना शिंदे यांनी केली. शाळेतील कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो. त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचे ट्रॅकिंग ठेवण्यात येणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!