Akola constituency : लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांकडून जोरात प्रचार सध्या सुरू आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शक्य ती सर्व माध्यमे वापरून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. मतदारांच्या भ्रमणध्वनींवर फोन करून उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. रेकॉर्ड केलेल्या उमेदवारांचा आवाज आणि दिवसभरात वेगवेगळ्या उमेदवारांचे दहा ते पंधरा कॉल दररोज येत असल्याने मतदारही वैतागले आहेत.
नाव, चिन्ह सांगून मतदान करण्याची विनंती या रेकॉर्ड फोन च्या माध्यमातून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेज मध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत तिहेरी लढत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीवर लागले आहे. दरम्यान उमेदवार यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे. सोशल मीडिया, ऑटो, बॅनर्स, भोंगे आदीद्वारे जोरात प्रचार सध्या सर्वच मतदारसंघात सुरू आहे.
अकोल्यातही मोठ्या प्रमाणात प्रचाराने जोर पकडला आहे. प्रचार तोफा थांबण्यासाठी अवघा काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रचारात कुठलीही कसर राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे मतदारांना प्रत्यक्ष फोन कॉलवर भर देण्यात येत आहे. उमेदवाराच्या रेकॉर्ड्स केलेल्या आवाजात मोठया प्रमाणात फोन कॉल्स हे मतदारांना येत आहेत. सकाळ पासून तर रात्री झोपेपर्यंत उमेदवार यांचे आवाजातील फोन कॉल येत असल्याने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दिवसभरात दहा ते पंधरा कॉल येत असल्याने मतदारही वैतागून गेले आहेत.
Lok Sabha Election : ‘लोकहित’ने जे जे लिहिले तेच अमित शाह अकोल्यात बोलले
दिवसभरात भरमसाठ कॉल!
प्रचार कार्यालयातून किंवा प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून रेकॉर्डेड कॉल येत आहेत. मात्र, असे बहुतांश रेकॉर्डेड कॉल कट करून टाकले जात असल्याचे अनुभव आल्याने प्रचार यंत्रणेमार्फत उमेदवार यांचे प्रत्यक्ष आवाज असलेले टेलिकॉलर्सद्वारे फोन केले जात आहेत. संबंधित उमेदवार प्रत्यक्ष मतदाराशी बोलून आपले नाव, निशाणी सांगून या तारखेला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. दरम्यान दिवसभरात दहा ते पंधरा कॉल येत असल्याने याला ही मतदार वैतागून कॉल कट करीत आहेत. तर दुसरीकडे दुसऱ्या मतदारसंघातील उमेदवारांचेही कॉल येत असल्याने मतदार पुरते वैतागले आहेत. मात्र प्रचाराचे नवनवीन फंडे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आहे.