महाराष्ट्र

Assembly Election : मतदारांवर छाप पाडण्यासाठी उमेदवारांची चमकोगिरी 

Fake Security : स्वतःचाच तयार केला व्हीआयपी कॉनवा 

Election Campaign : मतदारांवर छाप पाडण्यासाठी निवडणुकीच्या काळात उमेदवार काय करतील याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार सध्या पश्चिम विदर्भातील काही मतदारसंघांमध्ये सुरू आहे. प्रचारादरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी काही उमेदवारांनी स्वतःचीच झेड प्लस सिक्युरिटी आणि कॉनवा तयार केला आहे. या सुरक्षा यंत्रणेतील सर्व लोक त्यांचेच कार्यकर्ते आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना कमांडो सारखे कपडे देण्यात आले आहेत. काहींना सफारी सूट आणि गळ्यात लटकवण्याची आय कार्ड देण्यात आले आहे.

जोरदार प्रचार

गावांमध्ये प्रसार करताना या स्वरचित व्हीआयपी सिक्युरिटी सोबत काही उमेदवार जोरदार प्रचार करीत आहेत. ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी या उमेदवारांनी मंत्र्याचा असतो त्याप्रमाणे ताफाही तयार केला आहे. यापैकी काही उमेदवार आपण सतत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतो असा दिखावा करीत आहेत. एखाद्या गावात गेल्यानंतर ग्रामीण नागरिक उमेदवारांजवळ तक्रार करतात. तक्रार केल्यानंतर हे उमेदवार मतदारांसमोरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवर बोलत असल्याचा दिखावा करीत आहेत.

अधिकाऱ्यांनाही झपाझापी

ग्रामीण भागातील नागरिक बरेचदा अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करतात. अशावेळी हे उमेदवार आपल्याच एका पंटर कार्यकर्त्याला फोन लावतात. फोनवरून आपण संबंधित अधिकाऱ्याशी बोलत आहोत असा बनाव करतात. संबंधित नागरिकाचे तक्रार सांगून अधिकाऱ्याला झाप झाप झापतात. त्यामुळे साहेबांनी ऐन निवडणुकीच्या काळातही अधिकाऱ्याला झापले, अशी चर्चा होते. या सर्व चमकोगिरीतून आपली किती राजकीय वजन आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न या उमेदवारांकडून केला जात आहे.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण मतदार आजही अत्यंत साधे आहेत. ग्रामीण भागातील ज्येष्ठ मतदार तर कमी शिक्षणामुळे आणखीनच साधे आणि भोळे आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या चमकोगिरीला हे मतदार भुलतात. महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं बरंच वजन आहे. आपल्याशिवाय सरकारमध्ये पानही हालत नाही असा दिखावा करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

Yogi Adityanath : भर सभेत म्हणाले अकोल्याचे उमेदवार वसंत खंडेलवाल

स्पष्ट होणार

विशेषतः पश्चिम विदर्भातील काही ग्रामीण भागामध्ये तर उमेदवारांमध्ये सध्या ही चढाओढ प्रचंड प्रमाणात दिसत आहे. आजकालचा जमाना दिखाव्याचा आहे. जो जितका दिखावा करेल लोक तितका त्याला आदर देतात, असं मानलं जातं. त्यामुळे निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवार आपण जनतेचे कैवारी आहोत हे दाखवण्याचा आटापिटा करीत आहेत. उमेदवारांच्या या चमकोगिरीला मतदार बळी पडतात, की त्यांचे खरे रूप ओळखून योग्य व्यक्तीला मतदान करतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!