Political campaign : विधानसभा निवडणूका जाहीर होताच प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरू झाली आहे. प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यावर सोशल मीडियावर प्रचाराचा फिव्हर वाढताना दिसत आहे. जाहीर सभांना अद्याप प्रारंभ झाला नसला तरी जाहिरातींच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावरील विविध पोस्ट, रील्स यावरून प्रचाराचा प्रारंभ झाला आहे. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर करायला सुरवात केली आहे. एकूणच प्रचाराला सध्या इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागही मागे नाही.
इत्यादी गोष्टींचा वापर
पूर्वी निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष सभा, पदयात्रा, बॅनरचा वापर करीत होते. निवडणूक म्हटलं की, हँडबिल, मोठमोठे कागदी पोस्टर्स, भोंगे, रंगवलेल्या भिंती, बिल्ले असे प्रचाराचे माध्यम होते. त्यावेळेस जो तो राजकीय पक्ष विविध रंगांनी आपल्या प्रचारासाठी गावातील भिंती रंगवायचा. विशेष रंग मिळो की न मिळो, चुना आणि गेरूने गावातील भिंती अगदी उठून दिसायच्या. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आता ना भिंती रंगवायची गरज आहे, ना कुठे फारसे भोंगे लावायची गरज पडते. आता थेट इंटरनेटद्वारे व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक अशी माध्यमे आली आहेत. मतदारांच्या मोबाइलवरच प्रचाराचा धुरळा उडालेला पाहायला मिळत आहे.
वेबसाइटवर सरकारने केलेल्या विकासकामांवर प्रकाश टाकणारे अनेक छोटे व्हिडीओही दाखविण्यात येत आहेत. व्हॉट्सअॅप सोशल मीडियामुळे राजकीय पक्ष व पुढाऱ्यांना कोणत्याही निर्बंधांशिवाय जनतेशी थेट संपर्क साधता येत आहे. तसेच मतदारांकडूनसुद्धा राबविलेल्या योजनांबद्दल अभिप्राय मागवता येत आहे. तर आम्ही गरिबांना अनुदान देणार, शेतकऱ्यांचे शेती कर्ज तसेच वीजबिल माफ करणार, अशी आश्वासने विरोधक देत आहेत.
Assembly Elections : बहुतांश मतदारसंघात आजी-माजी आमदार भिडणार
असा प्रचार
प्रचाराचे हायटेक फंडे कोणत्याही निर्बंधांशिवाय राजकीय पक्षांना जनतेशी त्वरित संपर्क साधण्यासही मदत होते. इन्स्टाग्राम किंवा एक्स मीडियासारखे इतर अनेक प्लॅटफॉर्म विशिष्ट वापरकत्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे त्याचे स्वरूपही वेगळे असते. मीडियासारखे मेसेज पोहोचवणारे प्लैटफॉर्म मतदारांवर प्रभाव टाकण्याचे माध्यम ठरत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसून येत आहेत.
२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवार सध्या डोअर टू डोअर जाऊ लागले आहेत. तसेच सभा, रॅलीने प्रचार सुरू करू लागले आहेत. 4 नोव्हेंबरनंतर निवडणुकीत रंगत येणार आहे. त्यानंतर शहरासह ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे