महाराष्ट्र

Assembly Elections : मध्य नागपुरात विनापरवानगी होतोय प्रचार!

Nagpur : एकाही प्रचाररथाला आरटीओची परवानगी नाही

निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत असताना बहुतांश उमेदवार व पक्षांकडून प्रचाररथाचा वापर करण्यात येत आहे. या प्रचाररथांसाठी आरटीओची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु काही प्रचाररथांसाठी अशी परवानगीच घेण्यात आलेली नाही. मध्य नागपुरात तर एकाही प्रचाररथाला आरटीओने परवानगी दिलेला नाही.

निवडणूक दहा दिवसांवर आली आहे. असे असताना मध्य नागपुरातून एकाही प्रचाररथाने आरटीओची परवानगी घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परवानगी न घेताच प्रचाररथ फिरत तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.

नागपूर शहर व ग्रामीण मिळून 12 मतदारसंघांत प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला आहे. मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक व नावीन्यपूर्ण प्रचाररथही सज्ज झाले आहेत. ऑटोरिक्षा, कार, बस आणि ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर होत आहे. सध्या शहरातील सहा मतदारसंघ मिळून 256 तर ग्रामीणमधील सहा मतदारसंघ मिळून 250 अशा एकूण 506 प्रचाररथाला आरटीओकडून परवानगी देण्यात आली आहे.

Akola West : संघाच्या बैठकीत अग्रवालसह उमेदवारांचा फैसला 

मोटारवाहन कायद्यानुसार आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत का, वाहनाचे बाह्यरचनेतील बदल, चालकाच्या दृष्टिक्षेपात बाधा तर नाही ना, अशा घटकांची तपासणी करून परवानगी देत आहेत. शहरातील पूर्व नागपूर मतदारसंघात आतापर्यंत सर्वात कमी 9, तर ग्रामीणमधील हिंगणा मतदारसंघात केवळ 3 प्रचाररथांनी आरटीओची परवानगी घेतली आहे. दक्षिण नागपुरात 73 तर, उमरेडमध्ये 100 प्रचाररथांनी परवानगी घेतली आहे. मात्र मध्य नागपुरात प्रचाररथांनी परवानगी का घेतलेली नाही व नियमांचे उल्लंघन सुरू आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!