Political War In Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. पुसद मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद मैंद यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवार यांनी विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीतर्फे पुसदमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मागील 25 वर्षांपासून पुसद मतदारसंघाचा विकास रखडला. दीर्घकाळ सत्ता असताना मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत. काही गावात अदयाप एसटी गेलीच नाही. आदिवासी वाड्यात स्मशानभूमी नाही. मागील पाच वर्षात दलाल व कॉन्ट्रॅक्टर मध्येच लोकप्रतिनिधी अडकून बसलेत. 67 कोटी रुपयांची नळ योजनेचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा त्यांनी आरोप पक्षाचे महासचिव डॉ. मोहम्मद नदीम केला.
यावेळी शरद मैंद म्हणाले, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मला सहकार्य मिळत आहे. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने या मतदारसंघाने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले. त्यांनीच खऱ्या अर्थाने मतदारसंघासह राज्याच्या विकासाला दिशा दिली. परंतु त्यांच्यानंतर मागील वर्षापासून या मतदारसंघातील विकास रखडला आहे. दीर्घकाळ सत्ता असतानाही मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. ‘अभी पुसद का मौसम बदल रहा है’, असा टोलाही त्यांनी लगावला.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाप्रवीण शिंदे, ज्येष्ठ नेते डॉ. मोहम्मद नदीम, जावेद हमीम, सचिन नाईक, राहुल सोनवणे, रंगराव काळे, अनिल ठाकूर, सिम्पल राठोड, वसंत पाटील, विजय चव्हाण, आप्पा मैंद, अर्जुन लोखंडे, शीलानंद कांबळे, ताहेर खान पठाण, विकास जामकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुसद विधानसभा मतदारसंघात 2019 मधील विधानसभा निवडणुकीत इंद्रनील नाईक यांनी लढत दिली होती. इंद्रनील नाईक यांना त्यावेळी 89 हजार 143 मतं मिळाली होती. निलय नाईक यांना 79 हजार 442 मतं मिळाली होती. अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर बेळे यांना 11 हजार 255 मतं मिळाली होती.
South West Nagpur : गुडधे पाटील यांना काँग्रेसने केला बळीचा बकरा?
यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्यानं महायुतीकडून इंद्रनील नाईक रिंगणात आहेत. विरोधात शरद मैंद निवडणूक लढवत आहेत. पुसदचे मतदार कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुसदच्या बंगल्यातून आमदार इंद्रनील यांचे सख्खे भाऊ ययाती नाईक हे देखील रिंगणात होते. त्यांनी कारंजा विधानसभा मतदारसंघातून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ययाती यांनी पुसद मतदारसंघातील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.