महाराष्ट्र

Buldhana : पण फडणवीसांच्या मनात होते ॲड.आकाश फुंडकर! 

Devendra Fadnavis आज संध्याकाळी घेणार मंत्रीपदाची शपथ...! खामगावात जल्लोष…

Assembly Election : विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आज 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातून महायुतीचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते, यावर तर्क वितर्क सुरू होते. जो तो आपापली बाजू लावून धरत होता.. संजय कुटे आणि चैनसुख संचेती यांचे नाव मंत्री पदाच्या शर्यतीत समोर होते. महिला मंत्री या नात्याने श्वेता महाले यांनादेखील संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची जोरदार आग्रही मागणी होती. या तिघांच्या तुलनेत ॲड.आकाश फुंडकर यांचे नाव मात्र फारसे समोर नव्हते.. मात्र भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरले आणि खामगावमधून तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणणाऱ्या ॲड. आकाश फुंडकर यांच्या नावावर मंत्री म्हणून शिक्कामोर्तब केले आहे..

आज सायंकाळी नागपुरात आकाश फुंडकर मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकाश फुंडकर यांना फोन करून मंत्री म्हणून शपथ घेण्याच्या सूचना दिल्या.

आकाश फुंडकर यांचे वडील स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून भाजप महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचवली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांनी कारकीर्द गाजवली. 2014 नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांची वर्णी लागली होती. मात्र भाऊसाहेब अकाली गेले. आता फुंडकर कुटुंबातून आकाश फुंडकर मंत्रीपदाची शपथ घेत आहेत.. ही वार्ता पसरताच खामगावमध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे.

 कार्यकर्ते निघाले नागपूरच्या दिशेने 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिपदासाठी आमदार आकाश फुंडकर यांना फोन आल्यानंतर व याबाबतची माहिती मतदारसंघात पोहोचल्यानंतर फुंडकर यांचे चाहते आणि कार्यकर्ते त्यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधी समारंभ सामील होण्यासाठी नागपूरच्या दिशेने सकाळपासून निघाले आहेत.

Nana Patole : नागपूरमध्ये ठरणार प्रदेशाध्यक्षांच्या भाग्याचा फैसला

डॉ. संजय कुटे होतील प्रदेशाध्यक्ष ?

देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू आणि मागील मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून पदभार सांभाळणारे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात पाचव्यांदा विजयाची पताका फडकवणारे आमदार डॉ संजय कुटे हे याही वेळेस कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात दिसतील, असा सर्वांनाच विश्वास होता. मात्र दुपारपर्यंत त्यांना तसा कॉल केला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ संजय कुटे हे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा प्रदेशाध्यक्ष म्हणून घेणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!