महाराष्ट्र

Lok Sabha Election : जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसैनिकांचा धिंगाणा

Buldhana Constituency : मद्यप्राशन करीत नारेबाजी; पोलिसांनी घेतले ताब्यात

Code Of Conduct : दारूच्या नशेत माणूस काय करेल याचा अंदाजच लावता येत नाही. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. दोन शिवसैनिकांनी खासदार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धिंगाणा घातला. या शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणूक असल्याचे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने प्रतिबंधात्मक आदेशही लावले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

प्रतापराव जाधव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर महायुतीची सभा घेण्यात आली. सभा संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात दारूच्या काही कार्यकर्ते शिरले व त्यांनी धिंगाणा घातला आहे. मंगळवारी (ता. दोन) हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला आहे. राजेश सोनुने आणि विनोद खंडारे असे धिंगाणा घालणाऱ्याचे नाव आहे. दोघेही मेहकर येथील रहिवासी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शिरत त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Lok Sabha Election : बुलढाणा काँग्रेस जिल्हाध्यक्षासह 25 जणांवर गुन्हे दाखल !

घोषणाबाजी करणारे हे दोन्ही कार्यकर्ते शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे समर्थक होते. पोलिसांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलिस, अधिकारी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या दोघांचा समजाविण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन दौघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

चुरशीचा सामना

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नरेंद्र खेडेकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. मुळे या निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध ठाकरे सेना असा थेट सामना रंगणार आहे. बुलढाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 1996 पासून ते 2019 पर्यंत 1998 मधील अपवाद वगळता येथून शिवसेना विजयी होत आली आहे. बुलढाणा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असताना आनंदराव अडसूळ तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 2009 पासून या मतदारसंघात खुल्या प्रवर्गात आला.

तुपकर, शिंदे, खेडेकरांचे आव्हान

विकांत तुपकर हे सातत्याने शेतकरी प्रश्नांवर लढत आहेत. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे आघाडीचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख असलेले नरेंद्र खेडेकर यांचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याने सेनेने निष्ठा या निकषावर त्यांची निवड केल्याचे बोलले जात आहे. नरेंद्र खेडेकर हे ते पहिल्यांदाच मोठ्या लढतीत उतरले आहेत. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार प्रतापराव जाधव भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना योग्य सन्मान देत नसल्याचा आरोप विजयराज शिंदे यांनी केला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!