एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात तीन जागांवर असले तरी पहिल्या फेरीत पक्षाला एकच मंत्रिपद मिळणार आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे या पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती सूत्रानुसार होती. मात्र आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याला केंद्रीय मंत्रीयपदाची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटात उतसाहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतापराव जाधव हे राज्यात चार वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार आहेत. 1995-99 या काळात शिवसेना-भाजपच्या पहिल्या सरकारमध्ये ते मंत्री होते. श्रीरंग बारणे हे दुसऱ्या मंत्रिपदासाठी पक्षाचे उमेदवार असतील. बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार आहेत. तिसऱ्या मंत्रिपदासाठी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचे नाव पुढे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
केंद्रीय मंत्रीपदाची भेट
शिंदे गट शिवसेनेतील कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेतील गटनेतेपदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्याला केंद्र सरकारमध्ये मंत्री बनवण्याची पक्षाची इच्छा असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची नजर केंद्रीय मंत्रिमंडळात तीन जागांवर असली तरी पहिल्या फेरीत पक्षाला एकच मंत्रिपद मिळणार असून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे या पदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. 9 जुन रोजी बुलढाणा येथील शिंदे गटाचे आमदार आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याला केंद्रीय मंत्रीयपदाची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली, अशी बातमी जिल्हावासीयांना दिली आहे.
Prakash Ambedkar : इंडिया आघाडीने केला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर
खासदार प्रतापराव जाधव यांच्या रूपाने आता 1997 नंतर या जिल्ह्याला केंदीय मंत्रीपद मिळणार आहे. हि भेट नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. त्यामुळे आता मोठया प्रमाणावर जिल्ह्याचा विकास होणार आहे. रेल्वे मार्ग, नदी जोड प्रकल्प, आणि एमआयडीसी चे प्रश्न मार्गी लागणार आहे. आपण जनतेनी त्यांना संधी दिली म्हणूनच प्रतापरावांना हे मिळालं. याच सर्व श्रेय बुलढाणावासियांना आहे. आणि याचा लाभ आपल्या सर्वांना होणार, असे संजय गायकवाड यांनी सांगीतले.
9 जुन रोजी सायंकाळी राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होईल. यानंतर देशभरातील केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांचा नाव शपथविधी मध्ये सर्वात पुढे राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.