महाराष्ट्र

Buldhana Politics : शिंदेंच्या आमदाराला झाली घाई

Shiv Sena : उमेदवारी घोषित नसतानाही अर्ज भरण्याची घोषणा

Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणूक घोषित झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष जागा वाटपाच्या वाटाघाटी करताना दिसत आहेत. अशात महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी आपली स्वतःची उमेदवारी घोषित करून टाकली आहे. अर्ज दाखल करण्याचा मुहूर्तही त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. 

वादग्रस्त वक्तव्य

बुलढाणा जिल्ह्यातील एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आपल्या विविध वादग्रस्त वक्तव्य सर्व परिचित आहेत. अशातच त्यांनी आता आणखी एक वक्तव्य केले आहे. महायुतीमधील जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. अशात या ‘आमदार महोदयांनी’ आपली उमेदवारी स्वतःच घोषित करून टाकली आहे. यासाठी त्यांनी खास पत्रकार परिषद घेतली. एवढ्यावरच न थांबता गायकवाड यांनी आपण 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

मांडला लेखाजोखा

महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकासकामे झाली. त्याचा लेखाजोखा आमदार संजय गायकवाड यांनी मांडला. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली. प्रत्येक घटकांसाठी महामंडळाची निर्मिती झाली. त्यांना सक्षम करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. महायुती सरकारमध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे असंख्य महिला त्याचा लाभ घेत आहे, असे गायकवाड म्हणाले.

महिलांच्या नावार गॅस असल्यास त्या महिलांना तीन गॅस मोफत दिले जात आहेत. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका अजोबा, आजी अशा विविध योजना सरकारच्या माध्यमातून राबिवल्या गेल्या. याचा मोठ्या प्रमाणात लाभ राज्यातील जनता घेत आहे. बांधकाम कामगारांसाठी सुद्धा विविध योजना सरकार राबवित आहे. महायुती सरकारच्या काळात अनेकांना विविध योजनांच्या माध्यामातून घरे मिळाली.

Assembly Election : आचारसंहिता लागू होताच शस्त्र गायब

विकासाची कामे

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली. काही प्रगतीपथावर आहेत. बुलढाणा शहरात विविध महापुरूषांची स्मारके उभारण्यात आली. शहरातील विद्युत रोषणाईने शहरला सौंदर्य प्राप्त झाले आहे. अनेक रस्त्याची कामे करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय कृषी महाविद्यालय सुद्धा सुरू झाले आहे, असं गायकवाड म्हणाले. अशाच प्रकारे बुलढाण्याच्या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी जनतेने महायुतीला साथ द्यावी, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!