महाराष्ट्र

Assembly Election : मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

Buldhana : वेतनात कपात केली जाणार नाही.

Voting day : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार मतदान दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने विविध आस्थापनांनी आपल्या कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतन सुट्टी द्यावी, असे आवाहन बुलढाणा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

परिपत्रक जारी

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार उद्योग विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 20 नोव्हेंबर 2024 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुट्टी दिली जाईल. उद्योग विभागात येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, मंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदींनाही ही सुट्टी लागू राहील. या सुट्टीच्या कारणास्तव व्यक्तीचे वेतनात कपात केली जाणार नाही.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल तर कमीत कमी दोन तासांची सवलत द्यावी मात्र, त्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिका-यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता येणे शक्य झाले नाही अशी तक्रार मतदाराकडून झाल्यास आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

जाहिरातींसाठी परवानगी आवश्यक

राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर किंवा प्रसारण करण्यापूर्वी जाहिरातींना राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. या समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी हे आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.जाहिरातींमध्ये दूरचित्रवाहिन्या, केबल नेटवर्क/ केबल वाहिन्यांवरचे प्रक्षेपण प्रसारण, चित्रपटगृहे, रेडिओ, खाजगी एफएम, सार्वजनिक ठिकाणी दृकश्राव्य माध्यमा‌द्वारे होणारे प्रसारण, ई-वृत्तपत्रांमधील जाहिरातींचे प्रकाशन, बल्क एसएमएस व्हॉईस मॅसेजेस यांचा समावेश होतो. तसेच मुद्रीत माध्यमांमध्ये मतदानाच्या आधीच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिरातींकरीता देखील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

Assembly Election : बुलढाणा जिल्ह्यात ‘जुनेच गडी नवा डाव’

समिती स्थापन

जाहिरातीचे पूर्वप्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती व राज्यस्तरावर राज्य पूर्वप्रमाणीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरील समितीकडे समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मतदारसंघातील व्यक्ती किंवा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक मीडियावर जारी करावयाच्या जाहिरातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे. तसेच राज्यस्तरीय समितीकडे सर्व नोंदणीकृत राजकीय पक्ष, संस्था यांनी जाहिरात पूर्व प्रमाणीकरणासाठी अर्ज करावयाचा आहे. या समितीकडून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण केले जाते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!