महाराष्ट्र

Uddhav Thackeray : फडणवीसांचा खोटा नरेटिव्ह अर्थसंकल्प

Maharashtra Legislature : जाहीर अर्थसंकल्पावर ठाकरेंची प्रतिक्रिया 

Budget Of Maharashtra : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षाच्या कारभाराला, आश्वासनांना कंटाळून महाराष्ट्राने त्यांना अद्दल घडविली. महाराष्ट्र ने जो त्यांना दणका दिला त्यामुळे त्यांचे डोळे किलकिले झालेले आहेत. आता परत जनता भाजपच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्राची जनता सुजाण आणि स्वाभिमानी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कितीही त्यांनी फसवण्याचे काम केले, तर हे आता होणार नाही.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

महाराष्ट्राचे उद्योग गुजरात मध्ये पळविण्यात येण्याचे षडयंत्र समोर आले. हे सर्व आता उघड झाले आहे. याबद्दल सभागृहात जाण्यापूर्वी मी बोललो होतो. आता काहीतरी धुरपेक करायची आणि जनतेला फसवायचे. रेटून खोटे बोलायचे आणि पुन्हा सरकार आणून लूबाडायला सुरुवात करायची. असे महायुतीला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणुकीच्या काही दिवस अगोदर याच प्रकारच्या घोषणा केल्या जातात. आज अर्थसंकल्पामध्ये आश्वासनांची अतिवृष्टी होती. त्यामध्ये थापांचा महापूर आणि सर्वच घटकाला आपल्या सोबत जोडून नेण्याचा खोटा प्रयत्न आहे . देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटीव, असं या अर्थसंकल्पाचा आपल्याला वर्णन करावे लागेल. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरोप केला.

श्वेतपत्रिका जाहीर करावी

अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद कशी करणार या गोष्टीचा उल्लेख नव्हताच. महाविकास आघाडीची मागणी आहे, जे काही आतापर्यंत आश्वासन दिली, दोन वर्षात ज्या काही घोषणा केल्या, त्यापैकी किती अमलात आल्या? त्यासाठी तज्ञांची एक कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी.

Akola MLA News : एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ; परत जाण्याचा प्रश्नच नाही

अनेक अशा योजना आहेत ज्या घोषित झाल्या परंतु प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या नाही. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, महिलांना जरा आपल्या बाजूला मतदानात करून केविलवाण्या पद्धतीने प्रयत्न केलेला दिसत आहे.

भेदभाव नको

लाडकी लेक किंवा लाडकी बहिण योजना, यांचा आम्ही स्वागत करतो. परंतु मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका, असे सुद्धा ठाकरे म्हणाले. मुलींसाठी काही आणत असाल, तर मुलांसाठी पण काहीतरीच आणा, असा सल्ला देखील त्यांनी दिला. राज्यात हजारो तरुण बेकार असताना, घरी गेल्यानंतर माता भगिनींना ते काय उत्तर देणार. या प्रश्नाचे उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. म्हणजेच रोजगार वाढीसाठी कुठेही या अर्थसंकल्पात योजना नाहीत.

थकबाकी माफ करा

अर्थसंकल्पात रोजगार वाढीसाठी कुठलेही नियोजन नाही. शेतकऱ्यांची विज बिल माफ करण्याची मागणी त्यांनी पूर्ण केली. पण शेतकऱ्यांचे कर्ज मुक्त करा, अशी मागणी सरकारने मान्य केली नाही. शेतकऱ्यांचे विज बिल माफ केल्यानंतर त्यांच्यावरती जी पैशाची थकबाकी आहे ती माफ होणार आहे का? तेवढी सर्व थकबाकी तुम्ही माफ करणार आहेत का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जुन्या गोष्टीची आठवण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिवेशनाच्या अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये होते. यामध्येच ठाकरे यांनी एका जुन्या गोष्टीची आठवण करून दिली.

Sudhir Mungantiwar : कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प

नाना यांना उद्देशून ठाकरे म्हणाली की, ज्यावेळेस तुमचे सरकार होते आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांनी संभाजीनगरला जाहीर केलं होतं की, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू. त्यावेळेस तात्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. त्यांनी तात्काळ ती मागणी पूर्ण केली. निवडणुकीच्या अगोदर शून्य रकमेची विज बिल शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली.

त्यानंतर निवडणुका झाल्या आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. निवडणूक झाल्यावर महिनाभरानंतर दाम दुपटीने वीज भरणा करा, नाहीतर विज कापण्यात अशी दरडावणी करण्यात आली. तशीच ही गोष्ट आजच्या अर्थसंकल्पात घडली आहे. कारण वीज बिल माफ केल्यानंतर शेतकऱ्यांचे इतर प्रश्नांची निवारण झाले नाहीत.

जीएसटी बद्दल बोलताना ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सध्यातरी खतावर जीएसटी कमी आहे. परंतु आधी ती 18% होती. शेतकऱ्यांनी विकत घेतलेल्या खतावरच्या जीएसटीतूनच केंद्र सरकार योजनेची रक्कम देतात. म्हणजे एका बाजूने शेतकऱ्याला लुटायचं आणि दुसऱ्या बाजूला ढोंगपणा रचायचा. सरकारला वाटत आहे की, अशा काही खोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं, तर सगळे चिडलेले लोक शांत होतील. तर असे अजिबात होणार नाही. असेही ठाकरे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!