Pune Constituency लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.. यामध्ये महाराष्ट्रातील 10 मतदारसंघांचा समावेश असून पुण्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर. मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करुन स्वाक्षरी केल्याचा प्रकार घडलाय. प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराने बोगस मतदान होत असल्याचा प्रकार उघड केला आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका
राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील मतदान केंद्रात धक्कादायक प्रकार घडला. मतदान केंद्रात बोगस मतदानामुळे गोंधळ उडाला. त्यामुळे अमोल कोल्हेंच्या प्रतिनिधींनी केंद्र प्रमुखांना जाब विचारला. बोगस मतदान होत असल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासन, निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा शंका उपस्थित होतेय
अनेक ठिकाणी गोंधळ
पुण्यात काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडले. काल भाजप पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. आज भाजप नेते हेमंत रासने यांनी आंदोलन केले. बुथच्या ठिकाणी काँग्रेसचा प्रचार होत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. तसेच भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रशासनावर संतापले. 4 पोलिंग बुथ असताना मतदारांसाठी एकच रांग असल्याने त्यांचा संताप झाला.अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक रांगेत उभे असल्याचे ईव्हीएम दिसून आले पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील इंटरनॅशनल स्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे काही वेळासाठी मतदान थांबवण्यात आले आहेत. मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने मतदान बंद ठेवावे लागले EVM मशीन बंद झाल्याने अनेक नागरिकांना रांगा दिसुन आल्या
हैदराबाद वेगळा प्रकार..
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या माधवी लता यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. माधवी लता या मतदान केंद्रावर जाऊन मुस्लिम महिला मतदारांचे बुरखे काढायला लावून त्यांची ओळखपत्र तपासत असल्याचे समोर आले आहे.माधवी लता यांच्या या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. हैदराबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून माधवी लता यांच्यावर मलकपेट पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला