JDS Mp Case : कर्नाटकमधील सेक्स स्कँडल प्रकरणात विशेष तपास पथक गठीत करण्यात आलेले आहे. या प्रकरणात आता प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरोधात सीबीआयकडून ब्लू कॉर्नर नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
ब्लू कॉर्नर नोटीस म्हणजे काय? ती का काढतात?
केंद्रीय तपास यंत्रणेकडून जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे खासदार आणि सेक्स स्कँडल प्रकरणी आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा डिप्लोमॅटिक पासपोर्टचा वापर करून जर्मनीला पसार झाले होते. आता त्यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस काढली जाऊ शकते. रेवण्णा यांचे प्रकरण देशभरात गाजत असून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
Lok Sabha Election : ठाकरे म्हणजे, पब, पार्टी आणि पॉर्न असा प्रकार
एसआयटी विशेष तपास पथक या प्रकरणात चौकशी करीत आहे. इतकेच नाही तर ऐन लोकसभा निवडणुकी दरम्यान हे प्रकरण बाहेर आल्यामुळे विरोधकांच्या हाती विषय लागला आहे.
जेडीएसच्या आडून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यात मतदान झाले. आणि पुढे ज्या भागात प्रचार सभा होत आहेत तिथे भाजप विरोधी टीका करत आहेत. विरोधकांना आयते कोलीत हाती लागले आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार का, हा सवाल उपस्थित केला जात आहे. रेवण्णा प्रकरण जितके गरम ठेवता येईल तेवढे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.