महाराष्ट्र

Assembly Election : भाजपचा डोळा 125 जागांवर !

BJP : विधानसभा निवडणुकीसाठी भाजापची तयारी जोरात

Political News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीही रिंगणात उतरली आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने 125 हून अधिक जागांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यादृष्टिने तयारी सुरू केली आहे. शिवसेनेपेक्षा जास्त जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे.

राज्यातील भाजपचे नेते विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा बोलू लागले होते. यामुळे भाजप व शिवसेनेच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत युती कायम राहणार, असे स्पष्ट केले. आता भाजप नेत्यांची भाषा बदलली आहे. युती कायम राहिली तर निम्म्या जागांची मागणी रेटून धरू, अशी भूमिका घेणारे भाजपचे राज्यातील नेते आता मवाळ झाले आहेत. मित्रपक्षांचा विचार करता यावेळी 125 हून अधिक जागा मिळणार नाहीत, या मतावर आले आहेत. त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी करताना 125 जागांसाठी रणनिती निश्चित केली आहे. गेल्या वेळी भाजपने राज्यात 119 जागा लढवल्या होत्या.

भारतीय जनता पार्टी अनेक वर्षांपासून राज्यात ११९ जागा लढवत आहे. त्यापैकी 19 मतदारसंघांमध्ये भाजपला कधीच विजय मिळालेला नाही. यावेळी या 19 मतदारसंघांमध्ये कोणत्याही स्थितीत विजय मिळवायचाच, असे धोरण भाजपच्या वर्तुळात आखण्यात आले आहे. भाजपच्या कोअर समितीतील प्रत्येक नेत्याने हे 19 मतदारसंघ वाटून घ्यावे. प्रत्येकाने आठ दिवस या मतदारसंघांमध्ये तळ ठोकावा, अशी सूचना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. पुण्याच्या बैठकीत कुणाला कोणत्या मतदारसंघात पाठवायचे यावर विचार केला जाणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी या मतदारसंघातील रणनिती ठरली पाहिजे, असे धोरण निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Raj Thackeray : साहेब येऊन गेल्यावरही घोषणेची प्रतीक्षा

सेनेपेक्षा जास्त जागांसाठी प्रयत्न 

भाजपने ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ असा नारा देत विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन २००’ चा नारा दिला आहे. तरीही शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे. पुढील आठवड्यापासून भाजपचे सर्व केंद्रीय मंत्री राज्यातील एकेका जिल्ह्यात तळ ठोकून शिवसेनेपक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्या दृष्टीकोनातून अनेकांकडे जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

error: Content is protected !!