महाराष्ट्र

Lok Sabha Election : भाजपने सहा वेळा भेदला काँग्रेसला बालेकिल्ला

Bhandara-Gondia Constituency : इतिहासाच्या पानावंर आजही आहे नोंद

BJP Vs Congress : भंडारा- गोंदियाचा इतिहासात अनेक नवनवीन रिकॉर्डची नोंद पहायला मिळत आहे. त्यामुळेच राज्याच्या निवडणुकीच्या नकाशात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची एक वेगळी ओळख आहे. या लोकसभा मतदारसंघात दिग्गजांनाही पराभवाचा सामना करावा लागला. खऱ्या अर्थाने हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र 2004 पासून आघाडीच्या धर्मात या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविली आहे. असे असले तरी सर्वाधिक वेळा काँग्रेसच्या उमेदवारांनाच मतदारांना प्रतिनिधीत्वाची संधी दिली आहे. त्यातही भाजपने सहा वेळा या बालेकिल्ल्याला भेदून निवडणूक सर केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी आपले वर्चस्व स्थापित करेल, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

 

Lok Sabha Election : निष्ठावंतांना अस्वस्थ करताहेत आयाराम-गयाराम!

1952 पासून लोकसभेमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व आहे. या लोकसभा मतदारसंघात उच्च विद्याविभूषित, अर्थशास्त्री व दिग्गज पुढाऱ्यांनी निवडणूक लढविली आहे. काही वेळा दिग्गांना या मतदार संघात पराभवाचाही सामना करावा लागला. 1952 पासून ते 2009 पर्यंतच्या निवडणुकीदरम्यान सर्वाधिक वेळा हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. एकंदरीत भंडारा-गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून मानला जात होता. परंतु भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भेदून 1987 मध्ये पहिली निवडणूक सर केली होती. त्या काळी भाजपऐवजी भालोद हा पक्ष होता. त्यानंतर सहा वेळा भाजपने या लोकसभा मतदार संघात विजय प्राप्त केले आहे.

राष्ट्रवादीला यश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडीच्या धर्मात एक वेळा यश मिळाले होते. उर्वरित सर्व लोकसभा निवडणूकत काँग्रेस पक्षाकडूनच प्रतिनिधीत्व करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात 2 आघाड्यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत असून कोणती आघाडी आपले वर्चस्व कायम ठेवणार? याकडे मतदारांसह राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!