महाराष्ट्र

BJP Politics : बावनकुळेंचा दावा; भाजप जाणार 105 च्या पार!

Assembly Elections Result : काँग्रेसही कॉन्फिडन्ट; महायुतीला धोबीपछाड देण्याचा दावा

एक्झिट पोल्सबाबत विविध कयास लावण्यात येत असले तरी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून भाजपला १०५ च्या वर जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील हाच आकडा मांडला आहे. भाजपला १०५ च्या वर जागा मिळणार, महायुती सहज मॅजिक फिगर गाठणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजावर मी काहीच बोलणार नाही. मात्र, राज्यात महायुतीचेच सरकार येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा फायदा समाजाला झाला होता. शेतकरी, महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या होत्या. त्यांनी आम्हालाच मतदान केले. भाजपसोबतच शिंदेसेना व राष्ट्रवादीला (अजित पवार गट) चांगल्या जागा मिळतील. महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळतील असे बावनकुळे यांनी सांगितले. अपक्षांची गरज भासली तरी आणि नाही भासली तरी त्यांना जवळ करण्याची आमची भूमिका आहे. त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना महायुतीत घेण्यावर आमचा भर असेल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

लोकसभेत अपेक्षेप्रमाणे निकाल लागले नव्हते. मात्र, यावेळी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते. येणारा विजय हा कार्यकर्त्यांचाच विजय असेल. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर जनतेत जाऊन संपर्क साधला व जाहीर सभा घेतल्या. लोकांमध्ये यावेळी मतदानाबाबत उत्साह व जागृती होती. सर्वच समाजांनी आम्हाला मदत केली. महाविकास आघाडीचा संविधानाचा खोटा नॅरेटिव्ह जनतेने नाकारला आहे. राहुल गांधी महाराष्ट्रात आलेले फुसके बार होते.

Assembly Elections : आयोगाचा असाही घोळ, इतिहासकाराला दाखवले मृत!

राहुल गांधी व काँग्रेसचा जाहीरनामा जनतेने गंभीरतेने घेतलाच नाही. काँग्रेसचा खोटारडेपणा उघडा पडला आहे, असे बावनकुळे म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पोलिंग एजंटच न्यायालयात गेला होता. त्यांच्या मतदारसंघातच ते अडचणीत आहेत व लाडक्या बहिणींनी सावत्र भावाला बरोबर ओळखले आहे, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.

जल्लोषाची तयारी पूर्ण

निकाल लागायला अद्याप चोवीस तास असले तरीही अनेकांनी जल्लोषाची तयारी केली आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक, सांगलीतील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विनय कोरे यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. मुळक यांच्या कार्यकर्त्यांनी जाहिरातींसाठी वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमध्ये फोन करणे सुरू केले आहे. तर विनय कोरे यांनी विजय झाल्याचेच बॅनर झळकावले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!