Congress News : उत्तर प्रदेश : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी निवडणूक रोख्यांना जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना म्हणून संबोधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने एक छुपी लाट आहे आणि लोकसभा निवडणुकीत भाजप 150 जागांपर्यंत मर्यादित राहील, असा दावाही त्यांनी केला.
गाझियाबादमध्ये अखिलेश यादव यांच्या समवेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, संपूर्ण देशात प्रचंड अंडरकरंट आहे. “मी जागांचा अंदाज लावत नाही. 15-20 दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की, भाजप 180 जागा जिंकेल, पण आता मला वाटते की त्यांना 150 जागा मिळतील. आम्हाला प्रत्येक राज्यातून अहवाल मिळत आहेत की आम्ही कामगिरी सुधारत आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आमची आघाडी खूप मजबूत आहे आणि आम्ही चांगली कामगिरी करू.”
राहुल गांधी म्हणाले, ‘ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. एकीकडे आरएसएस आणि भाजप संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत 2-3 मोठे मुद्दे असतात. बेरोजगारी आणि महागाई ही सर्वात मोठी समस्या आहे, पण भाजप लक्ष वळवण्यात व्यग्र आहे, या प्रश्नांवर ना पंतप्रधान बोलतात ना भाजप बोलते.
Lok Sabha Election : देशासाठी काँग्रेसी फासावर चढले, मोदींनी काय केले?
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
देशात लोकशाहीचा उत्सव सुरु होत असून, त्यासाठी संपूर्ण भारत देश सज्ज झाला आहे. देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात निवडणूकीच्या धर्तीवर मतदान पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडकरी, विकास ठाकरे, मुनगंटीवार, धानोरकरांसह बड्या नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तर, पूर्व विदर्भातल्या लढाईत आज फडणवीस, पटोले, वडेट्टीवार, पटेलांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळणार असून, कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.