महाराष्ट्र

Bhandara Politics : भाजपची नवी खेळी : पटोलेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी पटेलांना उतरवले मैदानात ?

Mahayuti : भाजपने हक्क सोडला, साकोली मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साकोलीतून लढणार हे निश्चित आहे. त्यांच्याविरोधात लढविण्यासाठी भाजपकडे सध्यातरी कुणीच नाही, हेही स्पष्ट आहे. डॉ. परिणय फुके परिषदेवर गेल्यामुळे दुसरा चेहराच नाही. अशात भाजपने हा मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पटोलेंचा कार्यक्रम करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल स्वतः मैदानात उतरणार असल्याची माहिती ‘द लोकहित’ला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. प्रत्येक पक्ष आपली रणनीती ठरवताना पाहायला मिळत आहेत. साकोली मतदारसंघ राज्यातील सर्वात हाय प्रोफाईल मतदारसंघांपैकी एक समजला जातो. अशात भाजपने आपली वेगळी रणनीती आखल्याची खात्रीलायक माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या साकोलीतून भाजपने आपला हक्क सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘पंजा’ विरुद्ध ‘घड्याळ’ अशी थेट लढत आखली जात आहे.

साकोलीत काँग्रेसतर्फे नाना पटोले यांना उमेदवारी निश्चित आहे. आता नानांविरुद्ध तगडा उमेदवार देणे भाजपला क्रमपात्र आहे. साकोलीत नानांना कडवी झुंज देण्याची क्षमता भाजपच्या डॉ. परिणय फुकेंमध्ये आहे. पण ते नुकतेच विधानपरिषदेवर गेले आहेत. त्यांना पुन्हा मैदानात उतरविवण्याच्या विचारात भाजप नाही. त्यामुळे भाजपने साकोलीत आपली वेगळी रणनीती आखली आहे. महायुतीत भाजपने आपली हक्काची साकोलीची जागा अजित पवार गटाला देण्याचे ठरविल्याचे सूत्रांकडून कळते आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत साकोलीत भाजपचे लोक राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) प्रचार करणार आहेत.

Assembly Elections : चरण वाघमारे यांच्या एन्ट्रीने कुणाचे नुकसान?

पटोलेंविरुद्ध पटेल?

राज्याच्या राजकारणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजी-माजीचा वाद असो की ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून चर्चा असो. दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. त्याच साकोलीत पटोले आणि पटले यांना एकमेकांविरुद्ध भिडण्याची संधी भाजपने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे साकोलीची निवडणूक आता रंगतदार होणार, हे निश्चित आहे.

कोण आहे उमेदवार?

साकोलीत नाना पटोलेंच्या रुपात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात असतील. त्यातही या मतदारसंघाच्या निवडणुकीत नानांचे कुणबी समीकरणही महत्त्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपमधून आयात केलेल्या एका जिल्हा परिषद सदस्याच्या हाताला घड्याळ बांधली आहे. त्याला निवडणुकीत उतरवून पटोलेंना शह देण्यासाठी प्रफुल पटेलांनी कंबर कसली असल्याचे विश्वनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे. परंतु नाना पटोलेंच्या तुलनेत हा जिल्हा परिषद सदस्य अतिशय कमकुवत असल्याचेही सूत्र सांगतात. त्यामुळे नानांच्या विरोधात कमकुवत उमेदवार देऊन पटेल काय साध्य करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!