Odisha News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओडिशा भाजपने मोठी घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युतीबाबत अनेक दिवसांपासून राज्यात बैठकसत्र सुरू होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष युतीच्याअंतर्गत लढविणार असल्याची जोरदार चर्चा होती. यावर पूर्णविराम लागलेला आहे. ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप एकट्याने लढवणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी सोशल मीडियावर केली आहे. ट्विटर (Twitter) वरून त्यांनी भाजप लोकसभेच्या सर्व 21 आणि विधानसभेच्या सर्व 147 जागांवर एकटाच लढणारची घोषणा केली.
सामल काय म्हणाले?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर याबाबत घोषणा केली. ‘आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही बिजू जनता दलाचे आभार व्यक्त करतो. देशात जिथे जिथे दुहेरी इंजिनचे सरकार आले जिकडे विकास कामे झाल्याचा अनुभव आला आहे. पण आज नरेंद्र मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना ओडिशात पोहोचत नाहीत. त्यामुळे ओडिशातील गरीबांना त्याचा लाभ मिळत नाही.’