महाराष्ट्र

Assembly Election : रामटेक भाजपमध्ये भूकंप; रेड्डींच्या निलंबनानंतर राजीनाम्यांचे सत्र!

Mallikarjuna Reddy : आशीष जयस्वाल यांची डोकेदुखी वाढली; रेड्डी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत 

Ramtek constituency : शिंदेसेनेत प्रवेश घेतलेले आमदार आशीष जयस्वाल यांच्या उमेदवारीला माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी विरोध केला आहे. अर्थात हा विरोध त्यांना महागात पडला. पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत त्यांना सहा वर्षांसाठी भाजपमधून निलंबित करण्यात आले. पण आता रेड्डींचे निलंबन भाजपसाठीच अडचणीची ठरत आहे.

पक्षशिस्तीच्या नावाखाली करण्यात आलेली कारवाई भाजपसाठी नुकसानदायक ठरण्याची चिन्हे आहेत. रामटेक येथील गंगाभवन येथे भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात भाजपचे ५१२ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राजीनामे दिले. यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे.

जयस्वाल यांनी 2019 मध्ये युतीधर्म पाळला नव्हता. रामटेकमध्ये युतीचा उमेदवार बदलावा, अशी भूमिका आपण पक्षातील नेत्यांनी सांगितली होती, असे रेड्डी यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. 2019 मध्ये युतीचा धर्म न पाळणाऱ्या व भाजप कार्यकर्त्यांची गळचेपी करणाऱ्या उमेदवाराला परत युतीची उमेदवारी जाहीर झाली. हे कार्यकर्त्यांना पचनी पडले नाही. आम्ही पक्षवाढीसाठी प्रयत्न करतो; पण आमच्या भावना लक्षात न घेता उमेदवारी जाहीर करणे अयोग्य आहे.

रेड्डी यांना निलंबित करण्यात अगोदर स्पष्टीकरण मागणे आवश्यक होते. पण घाईघाईने पत्र निघाले, अशी पदाधिकाऱ्यांची भावना आहे. रामटेक मतदारसंघात आमदार आशिष जयस्वाल वगळता महायुतीने दुसरा उमेदवार जाहीर करावा. भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते निष्ठेने काम करतील. तसेच रेड्डी यांचे निलंबन रद्द करण्याबाबत पक्षाने फेरविचार करावा, अशी मागणी भाजपमध्ये जोर धरते आहे.

Mallikarjun Reddy : नेत्यांची झोप काढणे भोवले; सहा वर्षांसाठी हकालपट्टी

रेड्डींनी मनावर घेतले तर?

मल्लिकार्जून रेड्डी एकदा आमदार होते. पण ते मोदी लाटेत आणि जयस्वाल यांच्याविरोधातील वातावरणामुळे निवडून आले असे बोलले जात होते. पण त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. 2019 मध्ये जयस्वाल अपक्ष लढले आणि रेड्डींना भाजपने तिकीट दिले. पण त्या निवडणुकीत रेड्डींचा जवळपास 25 हजारांनी पराभव झाला. मात्र, आता रेड्डींनी मनावर घेतले तर भाजपचे लोक जयस्वाल यांचे काम करणार नाही. भाजप आणि संघाचा या मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे जयस्वाल यांच्या निमित्ताने महायुतीला मोठा फटका बसू शकतो.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!