महाराष्ट्र

Modi 3.0 : ताईंच्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी मुंडे समर्थक आग्रही

Pankaja Munde : बीडमध्ये झळकले मागणीचे बॅनर्स

Maharashtra BJP : नरेंद्र मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा होत आहे. 9 जून रोजी राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदींसोबत इतर 46 खासदार याचा शपथविधी होणार आहे. अशातच बीडमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुडेंचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आणि भावूक झाले आहेत. त्यातूनच पंकजा मुंडेंना केंद्रात कॅबिनेटमंत्रिपद देण्याची मागणी करण्यात येत आहे. बीड लोकसभेत यंदा बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात लढत झाली. या लढतीत पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतरही त्यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी होत आहे.

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूरयेथील एका युवकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता. मुंडे समर्थकांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता मुंडे यांना मंत्री करा, अशी मागणी होत आहे. बीडमध्ये वातावरण तापले असताना कार्यकर्त्यांनी ‘पंकजा ताईंची कॅबिनेटपदासाठी निवड करा’, अशी बॅनरबाजी केली आहे.

बंदचे पडसाद

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला. याप्रकरणी सकल ओबीसी आणि सकल वंजारी समाजाच्यावतीनेनिषेध करण्यात आला. पाथर्डी बंदची हाक देण्यात आली होती. या घटनेचे पडसाद आता बीडमध्येही उमटले आहेत. बीड जिल्ह्यातील शिरूर बंदचे आवाहन करण्यात आले. शिरुरमध्ये सर्व दुकाने आणि छोटे व्यवसाय बंद ठेवण्यात आलेत. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.

पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका युवकाने पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवले. या प्रकारानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. बीडमध्ये बंद पुकारण्यात आला होता. आता शिरूरमध्ये बंदीची हाक आहे. त्यानंतर परळीमध्ये देखील तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पोलिस प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. अशात मंत्रिमंडळ शपथविधीच्या पूर्वसंध्येला बीड शहरभर बॅनर लागले आहेत.

Modi 3.0 : मंत्रिपदाबद्दल दादांचा गट अजूनही आशावादी

मुंडे यांना वरिष्ठ नेतृत्वाने कॅबिनेटमंत्रीपद द्यावं, अशा मागणीचे बॅनर झळकले आहेत. बीड शहरभर हे बॅनर लागल्याचे दिसून येत आहे. पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या गणेश लांडे यांनी हे बॅनर लावले आहेत. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे या खासदार म्हणून निवडून येतील असा कयास लावला जात होता. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. त्यानंतरही कार्यकर्त्यांनी जिद्द कायम आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!