BJP Vs NCP : शरद पवार यांच्या नादी कोण लागले आहे. च्या नादी त्यांचे लोक लागले आहेत. आमच्याकडे मोदी सरकारची अनेक कामे आहेत. विकासाचा मुद्दा आहे. विकास कामांची यादी आहे. महाराष्ट्र सरकारकडे एवढं काम आहे की आमच्या कामामुळे लोक आम्हाला मतं देतात. शरद पवारांकडे नादी लागायचं आम्हाला काम नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. नागपुरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीकडून वर्तमान पत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. त्यावर बावनकुळे यांनी टीका केली.
महायुतीची आमची जाहिरात खरी आहे. महाविकास आघाडीची जाहिरात खोटी आहे. महाविकास आघाडीत आपसात वाद आहे. त्यामुळे लोकसभेत जो परफॉर्मन्स होता, तो राहणार नाही. काँग्रेसने खोटं बोलून लोकसभेत मतं घेतली. चार महिन्यात जनतेनं काँग्रेसला सोडलं. हरियाणात काँग्रेसला नाकारलं आहे. महाराष्ट्रातही जनता काँग्रेससाठी तयार नाही. आपल्याला विश्वास आहे. पूर्ण बहुमताने महायुतीचा सरकार येणार आहे, असं बावनकुळे म्हणाले.
अंतिम टप्प्यात प्रचार
विधानसभा निवडणूक बुधवारी होत आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी त्यांनी दुचाकीनं प्रचार केला. पूर्ण बहुमताने महाराष्ट्रात महायुतीचा सरकार येत आहे. प्रचंड मोठा विजय महाराष्ट्रात मिळणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आमचा जाहीरनामा मान्य केला आहे. आमचा जाहीरनामा पसंत पडलेला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडला आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महायुतीला 165 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. अपक्ष आमच्या संपर्कात आज नाहीत. मात्र सरकार आल्यावर अपक्ष सरकार सोबत उभे राहतात, असंही त्यांनी म्हटलं.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे राज्यातील लाडकी बहीण योजनेवर, शेतकऱ्यांच्या वीज बील माफ केल्यावर टीका करत आहेत. काँग्रेसचे राज्य असलेल्या ठिकाणी सुरू केलेल्या योजना बंद केल्या जात आहे. राज्यातील प्रत्येक योजनेवर ते टीका करत असताना आता महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीला राज्यात कुठेही समर्थन नाही. त्यांच्याजवळ जाहीर सभामधून काहीही सांगण्यासारखे नाही. केवळ भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. फेक नेरेटीव्ह पसरवत लोकसभेत प्रचार केला. मात्र आता त्यांना यश मिळणार नाही, असंही बावनकुळे म्हणाले.