महाराष्ट्र

Lok Sabha Election : चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा पुन्हा महानालायक म्हणून उल्लेख

Bawankule Attack : उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा थांबतच नाही, बावनकुळेंची टीका

Bjp News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तोल गेला. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पुन्हा महानालायक मुख्यमंत्री संबोधले. ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना ट्वीटर त्यांनी मत व्यक्त केले.

समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची जी लक्षणे सांगितली आहेत त्यानुसार तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये | संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं || पण, उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही. अडीच वर्षे घरात बसून काढली. बोलण्यासाठी एक विकासकामही केलं नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते. उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि नेत्यांना सुद्धा नकोशी झाली आहे.

4 जून रोजी जनता उद्धव ठाकरेंना तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही असे सांगून चंद्रशेखर बावनकुळे एक्सवर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावं की, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा. 4 जून रोजी जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!