महाराष्ट्र

Anup Dhotre : खासदार मंत्र्यांना म्हणाले अकोल्याला टेक्सटाइल हब करायचेय

Giriraj Singh : कापूस प्रकल्प व्यापणार 50 हजार हेक्टर क्षेत्र

Cotton Growers Akola : अकोला हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होते. अशात शेतकऱ्यांनी राबविलेल्या हाय डेन्सिटी प्लान्टेशन सिस्टीमने (HDPS) मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कापूस उत्पादन अकोल्यात होते, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण अकोल्यात कापूस प्रक्रिया उद्योगांचा अभाव आहे. अकोल्यात सावतराम मिल, मोहता मिल, निळकंठ सूतगिरणी असे उद्योग होते. आता ते काळाच्या पडद्याआड केले. त्यामुळे अकोल्याला टेक्सटाइल हब बनवायची ईच्छा आहे. यासाठी सहकार्य करावेच लागेल, असा आग्रह अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केला.

खासदार धोत्रे यांनी दिल्लीत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. एचडीपीएस प्रणालीच्या प्रयोगासाठी अकोल्याची निवड करण्यात आली. त्यासंदर्भात खासदार धोत्रे यांनी सिंह यांच्याशी चर्चा केली. एचडीपीएस तंत्रज्ञानामुळे कापसाच्या उत्पन्नात 1 हजार 500 किलोपर्यंत वाढ शक्य होणार आहे. त्यासाठी 50 हजार हेक्टर क्षेत्र यांत्रिक शेतीखाली येणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान अकोल्यातील कापसाच्या सद्य:स्थितीबद्दल सिंह यांनी माहिती दिली.

असा होणार लाभ

सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्चच्या (CICR) प्रकल्पाबद्दल सिंह म्हणाले, सध्या अकोल्यात 3 हजार 500 हेक्टरवर नव्याने कापसाचे काम हाती घेण्यात आले आहे. हाय डेन्सिटी प्लान्टेशन सिस्टीमचे परिणाम आशादायक आहेत. अकोल्यातून हाती आलेल्या कापसाचा दर्जा इतरांच्या तुलनेत उत्तम आहे. उत्तर, दक्षिण आणि मध्य हे कापूस उत्पादनाचे तीन झोन आहेत. त्यात अकोल्यातील पांढरे सोने अव्वल ठरू शकते. याच अनुषंगाने अकोल्यात टेक्सटाइल हब होऊ शकतो, हे धोत्रे यांनी सिंह यांच्या लक्षात आणून दिले. अकोल्यात असलेल्या संसाधनांच्या उपलब्धतेबद्दल धोत्रे यांनी यावेळी सिंह यांना माहिती दिली.

अकोल्यात यापूर्वी किती कापूस उद्योग व मिल्स होते, हे देखील सांगितले. कालौघात पांढऱ्या सोन्यावर काळी छाया पडल्याबद्दल धोत्रे यांनी दु:खही व्यक्त केले. पण अकोल्याला टेक्सटाइल उद्योगांचे हब बनविता येऊ शकते. तशी आपली ईच्छा आहे. त्यामुळे यासाठी सहकार्य करावे, असा आग्रह धोत्रे यांनी सिंह यांच्याकडे केला. त्यावर सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Akola BJP : त्यापेक्षा साजिद खानलाच भाजपमध्ये घ्यावे

असे आले तंत्रज्ञान 

अकोल्यातील दिलीप ठाकरे यांनी 2023 मध्ये दोन हेक्टरवर या तंत्राच्या माध्यमातून कापसाचे पीक घेतले होते. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी ‘क्लोज-स्पेसिंग’च्या माध्यमातून कमी जागेत जास्त रोपांची लागवड केली. त्यातून प्रति एकर 14 ते 18 क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. आता भारताने दरवर्षी 20 दशलक्ष टन कापूस उत्पादनाचे लक्ष्य ठोळ्यापुढे ठेवल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. त्यावर अकोल्यात कापड निर्मिती कारखाना, कापूसपूरक व्यावसाय, कापूसपूरक उद्योग, उपक्रम अशा योजना राबविता येऊ शकतात असे खासदार धोत्रे म्हणाले. अकोल्यात असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाबीजबद्दलही त्यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांना विस्तृत माहिती दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!