महाराष्ट्र

Pravin Darekar : विरोधकांचा पर्दाफाश करणार

Maharashtra BJP : महाराष्ट्रात राबविणार खास अभियान

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या अपप्रचाराला जशास तसे उत्तर देण्यास भाजपने सुरुवात केली आहे. भाजपने अनेक नेते दोन सत्रांमध्ये विरोधकांच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देत आहेत. अशात भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनीही सोमवारपासून (ता. 29) पर्दाफाश अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. वर्तमानपत्रात, प्रसारमाध्यमांत बातम्या कशा पेरण्यात येत आहेत, याची पोलखोल दरेकर करणार आहेत. मुंबईत (Mumbai) त्यांनी ही माहिती दिली.

जरांगे पाटील यांच्या ईशाऱ्याला दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. जरांगे यांनी इतरांवर राजकीय बोलणे सुरू केले आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मूळ प्रश्नांना ते बगल देत आहेत. आंदोलनात खोटेपणाचा वापर केला जात आहे. ठरवून वक्तव्य केली जात आहेत. यासंदर्भातील आता बोलणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सरकार आंदोलकांच्या भूमिकेशी सकारात्मक आहे. ओबीसीतूनच (OBC) आरक्षण द्या असा आग्रह आहे. त्या आग्रहाशी राज्यातील एकही पक्ष सहमत नाहीत. जरांगे यांनी शरद पवारांनी (Sharad Pawar) ओबीसीतून आरक्षण द्यावे का? याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे दरेकर म्हणाले.

आघाडीची भूमिका विचारा 

काँग्रेस, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा महाविकास आघाडीने ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात काय भूमिका आहे ते सांगावे. जरांगेंनी ज्या मागण्या केल्या, त्याबाबत सर्व विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. शरद पवार बोलताहेत हाके, जरांगे यांना एकत्रित घेऊन बैठक घ्यावी. अशा प्रकारची बैठक घ्यायला काहीच हरकत नाही. मुख्यमंत्री याची दखल घेऊन बैठक आयोजितही करतील. परंतु इकडे ढकलाढकलीचे काम सुरू आहे. पवार इकडे बैठक घ्या बोलतात. दुसरीकडे जरांगे बोलत आहेत की, तिकडे जाऊन आम्ही काय करणार. सरकारने भूमिका घ्यावी म्हणून शरद पवार बोलत आहेत, याकडेही दरेकर यांनी लक्ष वेधले.

सगळ्यांनी एका व्यासपीठावर येण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या मनात काय दडले आहे, भूमिका काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल. मुख्यमंत्री ज्यावेळी पुढाकार घेतील, त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित यावे. शरद पवारांनी आवर्जून उपस्थित राहावे. आपली भूमिका मांडावी. थोरवे-तटकरे यांच्यातील शाब्दिक वादावार बोलताना दरेकर म्हणाले की, आमदारासारख्या महत्वाच्या लोकप्रतिनिधी, नेत्यानेही वक्तव्य टाळली पाहिजे. आपण महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत. महायुतीत वितुष्ट येईल, अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत. खो-खो सारखा खेळ कोणीही खेळू नये. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या (Mahayuti) मेळाव्यात सांगितले होते की, कुणाला खुमखूमी आली तर पक्ष प्रमुखांशी बोला. महायुतीत वाद होईल आणि निवडणुकीवर परिणाम होईल असे वक्तव्य करू नये.

उरण हत्याकांड चीड आणणारे आहे. लव्ह जिहादसंदर्भात महाराष्ट्रात घटना घडल्या आहेत. ही कार्यपद्धती पाहिली तर विदारक आहे. ज्या प्रकारे हत्या करण्यात आली ते दु:खद आहे. चेहरा विद्रूप करण्यात आला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात व्हायला लागल्या आहेत. नराधम विशिष्ट प्रवृत्तीचे आहेत. ज्यावेळी आम्ही लव्ह जिहादसाठी मोर्चे काढतो, त्यावेळी आम्हाला विशिष्ट चौकटीत उभे केले जाते. अशा प्रवृत्तीना ठेचून काढण्याची गरज आहे, असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

Pankaja Munde : मंत्रिपदाबाबत तुम्ही बघा, मीही बघते

आरक्षणावर राजकारण

प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत दरेकर म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जण आपले राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. सर्व समाज घटकांनी शांततेत राहावे. प्रत्येक जातीत भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला खतपाणी घालणारी वक्तव्य कुणी करू नये. जरांगे रोज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अश्लील शिव्या देत असतील, तर एवढे निर्लज्ज महाराष्ट्रातील संस्कार झालेले नाही, असे दरेकर म्हणावे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विधानावर दरेकर यांनी भाष्य केले. खोटे बोलायला काही लागत नाही. कोणताही पुरावा नसताना बोलायला काही लागत नाही. पुरावे असतील तर देशमुख यांनी समोर आणावे. खोटे अशा प्रकारे बोलले जात आहे की, लोकांना हे खरे वाटावे. खोट्या बातम्या पेरायच्या. एखाद्या विषयाला तो खराच आहे, अशा प्रकारे दाखवायचे हा विरोधी पक्षाचा धंदा झाला आहे, असेही दरेकर यांनी सांगितले. महायुतीमधील तीनही पक्ष सोबत निवडणूक लढणार आहे. महाराष्ट्रात 288 जागा लढण्याची क्षमता आणि त्या ताकदीचे उमेदवार भाजपाकडे आहेत. परंतु याचा अर्थ 288 ठिकाणी भाजपा उमेदवार उभे करेल, असा होत नसल्याचेही दरेकर म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!