महाराष्ट्र

Akola BJP : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच जल्लोष

Randhir Sawarkar : प्रतिस्पर्धीच नसल्यानं समर्थक ठाम

Assembly Election : महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यापैकी कोणीही अद्याप उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. काँग्रेसच्या नावानं एक यादी शुक्रवारी (18 ऑक्टोबर) प्रसिद्ध झाली होती. मात्र सायंकाळी काँग्रेसनं ही यादी ‘फेक’ असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि काही छोटे पक्ष वगळता अद्याप कोणीही उमेदवारांची नावं अंतिम केलेली नाही. अशात अकोल्यात भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या नावानं विजयोत्सवाच्या पोस्ट व्हायरल झाल्यानं चर्चा होत आहे.

दावेदारी नाही 

रणधीर सावरकर हे भाजपचे अकोल्यातील ज्येष्ठ नेते आहेत. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. त्यांच्या विरोधात अकोला भाजपमधून कोणीही दावेदारी दाखल केलेली नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रणधीर सावरकर यांची उमेदवारी निश्चितच आहे. महायुतीत जागा वाटपावर चर्चा सुरू असताना अनेक जागांवर तीनही पक्षांचं एकमत झालं आहे. त्यात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे. अशात पूर्वमध्ये कोणतेही मतभेद नसल्यानं आता कार्यकर्ते आनंदित झाले आहेत.

अकोटमध्येही उत्साह

अकोला पूर्वसह अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अकोल्यात जसा उत्साह आहे, अगदी तसाच उत्साह अकोट मतदारसंघात देखील आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या या दोन्ही आमदारांनी पक्षाच्या कामात आघाडी घेतली होती. रणधीर सावरकर तर अकोल्यातील भाजपचे ‘लिंडिंग नेते’ आहेत. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिवसरात्र एक केला. अनुप धोत्रे हे नातेवाईक असल्यानंही त्यांनी त्यांच्या प्रचारासाठी खास वेळ दिला.

सावरकर आणि भारसाकळे यांच्या मतदारसंघात काही प्रमाणात ग्रामीण भाग येतो. विशेषत: सावरकर यांच्या मतदारसंघात खारपाणपट्ट्यातील भाग आहे. आतापर्यंतच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारने या भागातील नागरिकांना क्षारयुक्त पाणीच पाजले. खारपाणपट्टा उच्चाधिकार समिती तत्कालीन सरकारनं नेमली. पण ती उपयोगाची ठरली नाही. मात्र सावरकर यांनी त्यांच्या मतदारसंघात बऱ्यापैकी कामं केली. त्यांच्या प्रत्येक कामावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यांना टार्गेट पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्याला कारणही तसेच आहे. शिवसेना उपस्थित करीत असलेले अधिकांश मुद्दे हे अकोला शहराशी संबंधित आहे.

Nagpur : महाविकास आघाडीत बंडखोरीचे संकेत?

भाजपसमोर धोका

शिवसेना उपस्थित करीत असलेले मुद्दे हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात येतात. या मतदारसंघात मात्र भाजपसमोर धोका आहे. अकोला पूर्व आणि अकोट मतदारसंघात त्या तुलनेने भाजपला धोका कमी दिसत आहे. असे असले तरी अकोला जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ जिंकण्याचे आव्हान महायुतीपुढे आहे. अकोल्यातील भाजपमध्ये मतभेद सर्वश्रूत आहेत. अशात आता प्रदेश भाजपला हे बंड शांत करणे गरजेचे आहे. असे न झाल्यास अकोल्यात भाजपची वाट बिकट होऊ शकते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!