महाराष्ट्र

Pravin Darekar : सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांनी स्वत:च्या घराकडे बघावे

BJP On NCP : भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर

RSS Magazine Issue : सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घरात काय चाललेय ते पाहावे. आपल्या पायाखाली काय जळतेय याची काळजी करावी. दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची गरज नाही. अनेक संकटे, चढउतार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाहिलेत. त्यामुळेच केंद्रात तिसऱ्यांदा भाजपाला मोठ्या संख्येने यश मिळाले. संघांचे साप्ताहिक भाजपसाठी मार्गदर्शक, दिशादर्शक आहे. त्यांच्या सूचना आम्ही स्वागतार्ह मानतो. ताकदीने भाजप कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू. अजित पवार यांच्यावर आरोप झालेत. आरोपांची सिद्धता झाली नव्हती, हे अनेकदा समोर आलेय. त्यामुळे पुन्हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, असा टोला भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी हाणला. 

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित एका साप्ताहिक अजित पवारांशी केलेल्या युतीवरून लेख लिहिला. यावरून विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केले. त्यावर आमदार दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितले होते की, सह्याद्रीवरील बैठकीला विरोधी पक्षाचे नेते जाणीवपूर्वक उपस्थित नव्हते. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भूमिकेतून शिक्कामोर्तब झाले. बैठकच सुसंवादासाठी होती. बैठक सर्व पक्षांनी एकत्रित येऊन मराठा आरक्षण (Maratha Reservation), सगेसोयरे व ओबीसीच्या (OBC) हिताचे रक्षण या विषयासाठी होती, असे दरेकर म्हणाले.

प्रत्येक ठिकाणी राजकारण 

विरोधक प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहतात. व्यापक भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत आपले म्हणणे पवार सांगू शकले असते. सरकारची भुमिका व्यापक आणि स्पष्ट आहे. सरकारने अनेकदा सांगितले मराठा आरक्षण दिले आहे. ते कायद्याच्या चौकटीत टिकवले आहे. टिकवून ठेवले जाईल. सगेसोयरेबाबत संदर्भ तपासला जात आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. आलेल्या हरकतींच्याबाबतही माहिती घेत आहोत. ओबीसीच्या आरक्षणाला जराही धक्का लागणार नाही. त्यामुळे सरकारची स्पष्ट भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांची प्रतीक्षा संपली

महाविकास आघाडीचीच भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळेच त्यांनी बैठकीला येणे टाळले. महाराष्ट्र अशांततेच्या उंबरठ्यावर आहे. हा महाराष्ट्र शांत करण्यासाठी पुरोगामीत्वाचे नेहमीच समर्थन करणाऱ्या शरद पवारांनी पुढाकार घ्यावा. सरकारशी समन्वय साधावा, असेही दरेकर म्हणाले. छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखांनी अफझल खानाचा कोथळा काढला, ती लंडनहुन येणार आहेत. ज्या वाघनखांनी इतिहास घडविला, ती येत असतील तर त्याचे स्वागत आहे, असे दरेकर म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तारावर दरेकर म्हणाले की, हा विषय आपल्या अखत्यारीत येत नाही. राज्यातील तीनही पक्षांचे नेते यावर बोलू शकतीतल. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे शीर्षस्थ नेतृत्व याबाबतचा निर्णय घेत असते. त्यावर आपण भूमिका मांडणे योग्य नाही. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्री यांच्या अधिकार क्षेत्रातील मुद्दा आहे. तो त्यांच्या संमतीने होतो. मुख्यमंत्री जे बोलतील त्याला निश्चितच महत्व आहे. अजित पवार यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. नवाब मलिक (Nawab Malik) भाजपचे सदस्य नाहीत. त्यामुळे पवारांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे.

आई, मुलासारखे नाते

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाते आई, मुलाचे आहे. आरएसएस ही आमची मातृत्व संस्था आहे. भाजप हा त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळे आपल्या अपत्याला मार्गदर्शन करण्याचे, दिशा देण्याचे काम आईच्या भूमिकेतून करणे चुकीचे नसते. मुलगा कितीही ताकदवान झाला, तरी आईचे प्रेम, जिव्हाळा हवाच असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतही भाजपचे नाते तशाच पद्धतीचे आहे आणि राहील, असे दरेकर यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!