महाराष्ट्र

Parinay Fuke : विकासाबाबत साकोली मागास 

BJP : माजी मंत्री आमदार परिणय फुके यांची काँग्रेसवर टीका

Assembly Election : काँग्रेस पक्षामध्ये सुरुवातीपासूनच चाटूगिरीला महत्त्व आहे. इतिहास पाहिला तर काँग्रेसचे सगळेच नेते चाटूगिरीच्या भरोशावरच पदांवर राहिले आहेत. आजही काँग्रेसमध्ये हाच प्रकार सुरू आहे. भाजप नेते, माजी मंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसवर टीका करताना हा उल्लेख केला. मंगळवारी (ता. 24) नागपूर ते पत्रकारांशी बोलत होते.

नाना पटोले यांची मागणी

काँग्रेसच्या आमदारांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फुके यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसमध्ये कामाच्या भरोशावर नाही तर चाटूगिरीच्या भरोशावर पुढे जाता येते. आपल्या नेत्यांच्या पुढे पुढे करून त्यांना खुश ठेवायचे ही काँग्रेसची नीती आहे. मुख्यमंत्री पदाची मागणी देखील अशीच खुशमस्करी असल्याचे फुके यांनी नमूद केले. पुढे पुढे करून केवळ पद मिळवता येते. अशी पदम मिळाल्यानंतर विकास मात्र करता येत नाही, अशी टीकाही परिणय फुके यांनी केली.

विकास जाऊन बघा 

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात नाना पटोले हे राजकारण करतात. साकोलीचा परिसर हा त्यांचा मतदारसंघ आहे. महाराष्ट्रातील जनतेने या मतदारसंघात फिरावे. साकोली मधील अनेक गावांमध्ये मूलभूत विकासही झालेला नाही हे त्यांच्या त्यानंतर लक्षात येईल. त्यामुळे जो व्यक्ती आपल्या मतदारसंघामधील गावांचाच विकास करू शकत नाही, तो महाराष्ट्राचा विकास काय करणार, असा प्रश्नही परिणय फुके यांनी उपस्थित केला.

बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेतील आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. या विषयावरील आमदार परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली. बदलापुरातील घटना संतापजनक आणि निंदनीय आहे. अशा घटनेचे समर्थन करता येणार नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) त्यावरून प्रचंड राजकारण सुरू केले. लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारने तातडीने पावले उचलत आरोपीविरुद्ध कारवाई केली.

कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच या घटनेतील आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तर आरोपी मारला गेला. या मुद्द्यावरूनही आता महाविकास आघाडी राजकारण करत आहे. महाविकास आघाडी मधील नेत्यांजवळ आता कोणतेही काम राहिलेले नाही. महायुती (Mahayuti) सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. अशात ते एका नराधम आरोपीचा बचाव करत आहेत. पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत, याचा त्यांना विसर पडला आहे.

आनंदाचे वातावरण

बदलापुरातील आरोपीच्या एन्काऊंटर नंतर या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पीडित परिवाराला आणि जनतेला निसर्गानेच न्याय दिला आहे. परंतु महाविकास आघाडीमधील नेते केवळ सरकारला बदनाम करायचे म्हणून चित्र विचित्र वक्तव्य करीत देत आहेत. हा प्रकार म्हणजे लोकांच्या भावनांचा अपमानच आहे, अशी ठीक आहे माजी मंत्री तथा आमदार परिणय फुके यांनी केली.

error: Content is protected !!