BJP Reaction : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अजित पवार यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्यात त्यांनी पहिलीच योजना ही वारकऱ्यांच्या चरणी वाहिली. लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगिण विकासासाठी या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही योजना राज्याच्या हिताची असल्याची प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही मोठा घोषणा करण्यात आली. गाव तिथे गोदाम ही ती योजना आहे. योजनेसाठी 331 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 500 रुपये देण्यात येणार आहेत. गाईच्या दुधासाठी 5 रुपयाचे अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. शेतकऱ्यांना यातून मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी सौर कृषिपम्प देण्याची योजनाही जाहीर करण्यात आली, त्याचीही दानवे यांनी स्तुती केली.
दुसरे दिसतच नाही
शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प सांगलीच्या म्हैसाळ येथे उभारला जाणार आहे. दोन वर्षात 163 सिंचन प्रकल्प पूर्ण होतील. त्या असे अजित पवार यांनी जाहीर केले. विविध योजनांची माहिती दानवे यांनी दिली. विरोधकांवर त्यांनी टीका केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. विरोधकांना टीकेशिवाय काहीच दिसत नाही, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.सरकार जिथे जिथे एखादा प्रोजेक्ट हाती घेतो त्या प्रोजेक्टला विरोध करणे विरोधकांचे काम आहे. मुंबईची झोपडपट्टी असो की कोकणाची झोप नवीन प्रकल्प असो विरोध करणे विरोधकांचे काम आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने राज्याचा विकास करण्यात येतो मात्र विरोधक त्याला विरोध करत असतात.असे ते म्हणाले. केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुतीचे सरकार जनहिताच्या अनेक योजना राबवित आहे. त्यानंतरही अशा कल्याणकारी योजनांवर टीका करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधातील सामना जिंकला आहे. संघाने टी-20 विश्वचषक पटकावला आहे. भारतीय संघाने मोलाची कामगिरी केली. देशातील प्रत्येक नागरिकांने हा सामना पाहिला. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हा सामना पाहिला.
भारत विजयी झाल्यानंतर देशात मोठा जल्लोष झाला. अनेक वर्षांनंतर भारताचे स्वप्न पूर्ण झाले आहे. विश्वचषक भारताने जिंकला. 4 जुलैला टीम इंडिया भारतात दाखल झाली. त्यावेळी संघाचे दमदार स्वागत करण्यात आले. मुंबईत क्रिकेट प्रेमींनी संघाचे स्वागतही केले. लोकशाहीच्या विजयानंतर भारताने दुसरा विजय मिळविला आहे, असे रावसाहेब दानवे आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले.