महाराष्ट्र

Pravin Darekar : खडसेंशिवाय काही अडले असे दिसले नाही

BJP Reaction : भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकरांचा टोला

Maharashtra Politics : एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानावर भाजपा विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे शिवाय लोकसभेच्या निवडणूक पार पडली. जळगाव रावेर मधील रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या दोन्ही जागा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणल्या. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विजय मिळविला. खडसे यांच्याशिवाय काही अडले, असे दिसलेच नाही, असा टोला दरेकरांनी खडसे यांना लगावला. 

दरेकरांनी राज्यातील विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. जळगावात पक्षाचे संघटन चांगले आहे. असे असताना पुन्हा वातावरण गढूळ होऊ नये अअशी भावना कार्यकर्त्यांची आहे. कदाचित त्यामुळे खडसेंच्या पक्षांतराला उशीर होत असेल. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुन्हा झेंडा खांद्यावर घ्यायचा. स्वतःच्या आचार विचारापेक्षा राजकीय अस्तित्व हेच त्यांना महत्वाचे वाटत आहे हे दुर्दैव आहे.

आजही दिशाभूल 

वनराज आंदेकर गोळीबारप्रकरणी दरेकर म्हणाले, प्रॉपर्टीच्या वादातून ही घटना झाल्याचे समोर येते आहे. सुप्रिया सुळे या विरोधी पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्या त्याचे खापर सरकारवर, गृहमंत्र्यांवर फोडत आहेत. विकासाच्या बाबतीत जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांचा कुठलाही सहभाग नाही. केवळ डोक्यात राजकारण आहे. नीच स्तरावरील राजकारण दुर्दैवाने सुरू आहे. त्याचाच कित्ता सुप्रिया सुळे गिरवताना दिसत असल्याचा टोला दरेकरांनी लगावला.

Nana Patole : मराठवाड्यातील पालकमंत्री झाले गायब 

संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, औरंगजेब फॅन क्लब संदर्भात अमित शाह (Amit Shah) यांनी वक्तव्य केले आहे. यांची कृती आणि उक्ती यात फरक आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार त्यांनी सोडला आहे. हिंदुत्व द्वेष्टे जे आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेसाठी बसलेत. त्यामुळे त्यांचे विचार दूषित झालेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या तोंडाला लगाम नाही. ते राजकारणातील कुठली औलाद आहे,तेच कळत नाही. विकृत बोलायचे, काहीही बोलायचे आणि प्रसिद्धी माध्यमांत सनसनाटी निर्माण करून द्यायची.

अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या पोस्टर्सवर दरेकरांनी मत व्यक्त केले. महायुतीतील प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. महायुतीची भूमिका स्पष्ट आहे. मुख्यमंत्री महायुतीचा होईल. कुठल्याही पक्षाचा महायुती म्हणून मुख्यमंत्री घोषित झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला आपल्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावे असे वाटते त्यातून वक्तव्य येतात आणि अशाप्रकारचे पोस्टर्स लागत असतात. जागा वाटपाचा निकष हा मेरिटनुसार असेल. ज्याची जिंकण्याची जास्त शक्यता आहे, त्याला ती जागा. उमेदवाराच्या बाजूने जनाधार आहे आणि कार्यकर्त्यांना संमती आहे, अशांना संधी. अशा प्रकारे तीन, चार प्रमुख निकषावर जनतेचे मत हाच उमेदवारी देण्यावर भर, निकष असेल.

दरेकर म्हणाले की, मनोज जरांगेंचे रंग वेगवेगळ्या वेळेला बदलतात. सुरुवातीच्या आंदोलनापासून हे रंग दिसत आहेत. पहिली भूमिका कुणबी नोंदीबाबत घेतली. सगेसोयऱ्यांची भूमिका घेतली. आता जरांगेंनी मराठा समाजाच्या प्रश्नांची काळजी करावी. भाजपात कोण नाराज आहे, फडणवीसांवर कोण काय बोलतेय त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. महाराष्ट्रातील कार्यकर्ते, सर्व आमदार यांचा विश्वास देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) आहे, असे ते म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!