महाराष्ट्र

Pravin Darekar : राज ठाकरेंच्या विधानाला प्रत्युत्तर

Raj Thackeray : राजकीय अभिनिवेशातून सत्ताधाऱ्यांवर टीका

Maharashtra Politics : कोणत्याही पक्षाला निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर सत्ताधारी पक्षावर टीका करावी लागते. त्यांच्याकडे याशिवाय दुसरा मार्ग कोणता असतो? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय होत आहे. कोट्यवधी नावांची नोंदणी होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षावर टीका होते. कदाचित त्याच पद्धतीने राज ठाकरेंनी टीका केली असावी, असे भाजपचे गटनेता आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विधान केले. त्यांच्या विधानाला दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. 

 

लोकशाहीत प्रत्येक पक्षाला 288 जागा लढण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाचे महाराष्ट्रभर कार्यकर्ते आहेत. ते जास्तीत जास्त जागा लढविणे स्वाभाविक आहे. जागा लढवून कार्यकर्त्यांची फळी कार्यरत होते. त्यातून पक्षसंघटनही मजबूत होते. आगामी निवडणुकीत युती, आघाडी नेमकी कशी होणार हे अद्याप अधांतरी आहे. अशात प्रत्येक पक्ष स्वबळाची चाचपणी करीत आहे. त्याच पद्धतीने राज ठाकरे आणि मनसे प्रयत्न करत आहेत. जे प्रत्येक पक्ष करत असतो, असेही दरेकर म्हणाले.

प्रत्येक दिवस महत्वाचा

राजकारण व निवडणुकीच्या प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. प्रत्येक पक्ष तोंडावर बोट, हातावर घडी घालून बसू शकत नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची चाचपणी सुरू केली आहे. जास्त जागा लढविण्याचा निर्धार त्यांनी केला असावा. पक्ष आणि नेतृत्व असेच असायला हवे. पक्षाला पक्ष नेतृत्वाचा दरारा असेल तर पक्ष आणखी ताकदीने पुढे जाऊ शकतो. आमच्याही पक्षात जे अधिवेशन, बैठक, मेळावा सत्र झाले, त्यात कडक भूमिका घेतली आहे. बोटचेपी भूमिका घेऊन संघटन बांधता येत नाही, असे दरेकर यांनी नमूद केले.

Parliament Session : शेतकऱ्यांना कर्ज, व्याजातून दिलासा मिळावा

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे नावच टिकाकार आहे. ते सकाळी जाग आल्यानंतर कधी चांगले बोलले हे दाखवावे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर त्यांनी टीका सुरू असते. राऊत यांनी एकदा तरी शुभ बोलावे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून गरीबाच्या कल्याणाच्या चांगल्या योजना आल्या. देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरभरून दिले. तरी राऊत टीका करत आहेत. झोपलेल्याला जागे करता येते. पण येथे टीकाकारांनी झोपेचे सोंग घेतले आहे. कितीही चांगले केले तरी टिकाच करायची, हा संजय राऊत यांचा ठरलेला ‘प्लॅन’ आहे. पण आम्ही त्याला भीक घालत नाही. आमची बांधिलकी जनतेशी आहे. असे दरेकर यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींनी दहा वर्ष देशासाठी समर्पित भावनेने काम केले. पण ‘फेक नरेटिव्ह’च्या आधारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला. राज्य आणि केंद्र सरकार चांगले काम करत आहे. दोन्ही सरकारने अर्थसंकल्प चांगला दिला आहे. अशावेळी ‘फेक नरेटिव्ह’ तळागाळात पेरून वातावरण दूषित केले जात आहे. याबाबत भाजप ‘अलर्ट मोड’वर आहे. आता चुकीचे काही जाऊ देणार नाही, खरी गोष्ट ताकदीने सर्वसामान्य जनतेसमोर मांडणार असल्याचेही दरेकरांनी सांगितले

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!