महाराष्ट्र

Pravin Darekar : अनिल देशमुख यांनी माहिती दडवून ठेवली

Anil Deshmukh : हिरेन मृत्युप्रकरणात प्रविण दरेकरांचा आरोप

BJP Vs BJP : मनसुख हिरेन हत्येसंबंधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पूर्ण माहिती होती. त्यांनी ती माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कोणतीही माहिती देण्यास देशमुख तयार नव्हते. मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अनिल देशमुख यांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यातून या प्रकरणातील सत्यस्थिती उघड होईल, असा आरोप भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा दरेकर यांनी समाचार घेतला. राऊत वेडसर झाले आहेत. दिवभरातून तीनदा ते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) बोलत असतात. महाराष्ट्रात अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलत आहेत. सर्वाधिक दखल देवेंद्र फडणवीसांची घेतली जात आहे. सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांची राजकीय भीती आहे. त्यामुळेच त्यांना चौफेर घेरण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सर्व प्रकारांना पुरून उरण्याची क्षमता आणि ताकद फडणवीसांत आहे. संपूर्ण भाजप त्यांच्यासोबत आहे. महाराष्ट्राची जनता फडणवीसांची दखल घेत आहे. जनतेचे आशीर्वाद फडणवीसांच्या मागे आहेत, असेही दरेकर म्हणाले.

जनता शिंदेंच्या पाठीशी

खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत आहे. आमदार, पदाधिकारी, पक्षाचे नाव, चिन्हही त्यांच्याकडे आहे. कायदेशीरपणे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. प्रकाश आंबेडकरांचे (Prakash Ambedkar) यांनीही हेच मत व्यक्त केले आहे. आंबेडकर यांचे हे मत योग्य आहे. आंबेडकर हे वकील आहेत. त्यामुळे ते कायद्याच्या दृष्टीने बोलतात. मनसेने (MNS) जाहीर केलेल्या उमेदवार घोषणेवर दरेकर म्हणाले की, कोणते उमेदवार द्याचे, कोणाला उमेदवारी जाहीर करायची हा सर्वस्वी राज ठाकरे यांचा अधिकार आहे. महायुतीचा विषय होईल त्यावेळी महायुतीमधील जागा वाटपावर घटक पक्षांशी चर्चा होईल. त्यानंतर कोण कोणत्या मतदारसंघातून निडणूक लढेल हे ठरणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

Jansanman Yatra : राष्ट्रवादी दिंडोरितून फुंकणार रणशिंग!

विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत अद्याप महायुतीत कोणताही निर्णय झालेला नाही.

महायुती मधील जागावाटप नक्की झालेले नाही. कोणी कुठून लढायचे हे अंतिमरित्या ठरलेले नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत आपला पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांनी स्वतंत्र जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. महायुतीत अंतिम काही ठरलेले नाही. राज ठाकरे आणि महायुती एकत्र येणार नाही असे नाही. यासंदर्भात बोलणी सुरू नाही, असेही मानण्याचे कारण नाही. राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी त्यांनी दोनशेवर जागा लढण्याची चाचपणी त्यांनी केली आहे. त्यादृष्टीने ठाकरे तयारी करीत असल्याचे दरेकरांनी स्पष्ट केले.

घाटगे निष्ठावंत 

कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीच्या चिन्हावर समरजित घाटगे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी शरद पवार (Shrad Pawar) गटाने सुरू केल्याच्या चर्चावर दरेकर म्हणाले की, समरजित घाटगे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. शरद पवारांनी कितीही खुणावले तरी त्याला ते दाद देणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या बैठकीत अदानी उद्योग समूहाचे अधिकारी उपस्थित होते, अशी चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात धाकधूक आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी यावर भूमिका स्पष्ट करावी. एका बाजुला पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. दुसऱ्या बाजुला पवारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करायचा. नेमकी भूमिका काय हे त्यांनी सांगावे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, जरांगे भ्रमीत दिसत आहेत. महाराष्ट्रातून त्यांना मराठा समाजाचा जो काही जनाधार होता तो पूर्णपणे कमी होताना दिसत आहे. त्यांनी आता जाहीर राजकीय भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) किंवा मराठ्यांचे प्रश्न हा विषय जरांगेंच्या लेखी संपलेला आहे. गेले महिनाभर ते मराठा आरक्षणाबाबत एक शब्दही बोललेले नाही. ते केवळ कुणाला पाडायचे, कुणाला निवडून आणायचे यावर बोलत आहेत. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सुपारी घेतल्यासारखे राजकीय काम त्यांनी सुरू केले आहे. त्यांनी तुतारी थेट हातात घेऊन वाजवावी. मराठा समाजाच्या नावाखाली राजकारण करू नये, असा इशाराही दरेकरांनी जरांगेंना दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!