महाराष्ट्र

Pravin Darekar : जरांगेंनी सुपारीच घेतलीय

Maratha Reservation : छुपा अजेंडा पुढे आला; डोक्यात अहंकाराची हवा

BJP On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यात अहंकार आला आहे. आंदोलनामागील छुपा अजेंडा पुढे आला आहे. त्यांचा खरा चेहरा मराठा समाजासमोर आला आहे. मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होऊन त्यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे, अशी टीका भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. जरांगे यांनी केलेल्या विधानांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. जरांगे यांचर राजकीय महत्वकांक्षा, सत्ताकारण लपून नाही. ते मराठा समाजाला वेठीस धरत आहेत, असे दरेकर म्हणाले.

जरांगेंचा खेळ आता संपायला आल आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळू लागले आहे. त्यामुळे ते वाटेल ते बोलत आहेत. जरांगे म्हणाले उपोषण झाल्यावर बघून घेतो. मी त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. त्यांना काय बघायचे ते बघून घ्यावे. असले बालबोध चॅलेंज मराठा ते समाजाच्या जीवावरच करत होते. जरांगे यांच्या लोकांनी सांगितले की, आता उपोषणाकडे सगळे पाठ फिरवित आहेत. ना सरकारचे मंत्री येणार, ना कुणी समर्थक. आतापर्यंत पाच वेळा उपोषणे झाली. असे उपोषण जगात पाहिले नाही, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

वेळेचा अपव्यय 

आंदोलनात मराठा समाजाविषयासंदर्भात जरांगे यांनी किती वेळ घालवला? दुसऱ्याची कुंडली काढण्याआधी त्यांनी स्वतःचीही कुंडली बघावी. दुसराही तुमची कुंडली जमवत असतो, याची जाणीव ठेवावी. जरागे यांच्या कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही. मराठा समाजाचा जरांगेंवरुन विश्वास उडाला आहे. त्यांची सुरुवातीची भाषा कुणबी नोंदी संदर्भात होती. त्यात सरकारने पुढाकार घेतला. त्यानंतर सगेसोयरेचा विषय आला. त्यावरही सरकारने सकारात्मकता दाखविली. त्याबाबत कामेही सुरू झाले आहे. परंतु आरक्षण हा विषय धगधगत राहिला पाहिजे, असा जरांगे यांचा प्रयत्न असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) कशी मदत होईल याची काळजी जरांगे घेत आहेत. लोकांनाही हे दिसत आहे. जरांगे यांच्या चर्चेच्या फेऱ्या आंदोलनातील मागण्यांबाबत व्हायला पाहिजे. परंतु ते राजकीय बोलत आहेत. आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हापासून राजेश टोपे, राजेश टोपेचा कारखाना, नंतर आलेले नेते या सगळ्यावरून संदर्भ लागत आहे. त्यामुळे जरांगे यांच्या नौटंकीला महाराष्ट्रातील मराठा समाज भुलणार नाही. माझ्यावर कुणी बोलायचेच नाही आणि बोलले तर त्याला व्यक्तिगतस्तरावर टार्गेट करायचे असे त्यांचे सुरू होते असे ते म्हणाले.

Mumbai : अजितदादांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास!

ओबीसीतून (OBC) मराठा समाजाला आरक्षण द्यावे का? हा सवाल जरांगे महाविकास आघाडीच्या नेत्यांना का विचारत नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर का बोलता? भाजपालाच का सवाल करता? यातून एकच स्पष्ट होते की, तुम्ही मराठा समाजाच्या भावनांचा खेळ मांडला आहे. ही त्यांची दुकानदारी आहे. जरांगे यांना सत्तेची आस लागली आहे. कुणाला निवडून आणायचे आणि कुणाला पाडायचे हा विषय कशाचा आहे. मराठा समाजाने पाठबळ दिले याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काहीही बोलाण्याचा अधिकार दिलेला नाही. खुर्ची खेचायची आहे तर या निवडणूक लढा, असे आव्हानही दरेकर यांनी दिले.

जरांगेनी पक्ष काढावा. महाविकास आघाडीतील घटकपक्ष व्हावे. राज्याचे मुख्यमंत्री व्हावे. मुख्यमंत्र्यांना जे शक्य नाही ते त्यांनी करावे. आंदोलनामागील सत्य लोकांच्या समोर येत आहे. त्यांची अपेक्षा आहे त्यांना जेलमध्ये टाकावे. कारण त्यांची पब्लिसिटी कमी होत आहे. पुन्हा जेलमध्ये गेले की गर्दी, लखलखाट, प्रसिद्धी मिळेल. त्यामुळेच त्यांचा अट्टाहास सुरू आहे. परंतु जेलमध्ये कोण कशासाठी जाते यासाठी संविधानाने दिलेले निकष आहेत, असे दरेकर यांनी नमूद केले.

न्यायप्रणालीवर टीका 

जरांगे यांचा कोर्टावर विश्वास हवा. फडणवीस कोर्टाला डायरेक्शन देऊ शकतात का? मुळात कोर्टाने नोटीस बजावलेली आहे. परंतु जरांगे यांच्या डोक्यात अहंकाराची हवा गेली आहे. पोलिस, सरकार, कोर्ट मानायला ते तयार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याचे काम सरकारने केले आहे. अलीकडेच झालेल्या भरतील मराठा समाजाची मुले 10 टक्के आरक्षणाप्रमाणे नियुक्त झाली आहेत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याची भूमिका सरकारची आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

जरांगे राजकीय पोळी भाजत आहेत. त्यांच्या आंदोलनाला कोण फूस देत आहे, हे स्पष्ट झाले आहे. यामागे जबाबदार मोठे नेते आहेत. जरांगे यांची भाषा ज्याप्रकारे चालली आहे, त्यानुसार विरोध कुणाला हे कळते. पाठिंबा कुणाला हे देखील स्पष्टपणे दिसते. लोकसभा निवडणुकीवेळी (Lok Sabha) मराठा समाजाला त्यांच्या भूमिकेचा अंदाज नव्हता. त्यामुळे भोळाभाबड्या समाजाचा विश्वास होता. परंतु आता जरांगे मराठ्यांचे प्रश्न सोडूप राजकीय झालेत. त्याचे दुःख मराठा समाजाला आहे. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण नेम चालवतोय हे स्पष्ट झाल्याचेही दरेकरांनी म्हटले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!