महाराष्ट्र

Daryapur Constituency : महायुतीत घमासान होण्याचे संकेत

Demotion : नवनीत राणा दर्यापूरसाठी इच्छुक असल्याची चर्चा

Mahayuti : लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र येत नवनीत राणा यांचा पराभव केला. महाविकास आघाडीसह महायुतीमधील सगळ्यांनीच राणा यांना पराभूत करण्यासाठी जमेल तसे काम केले. या पराभवानंतर आता नवनीत राणा डिमोशन स्वीकारयलाही तयार झाल्याची चर्चा आहे. भावना गवळी, कृपाल तुमाने यांच्यानंतर आता राणाही आमदारकीवर समाधान मानायला तयार आहेत. काहीही झालं तरी सत्ता पाहिजेच असं त्यांचं झाल्याचं यावरून बोललं जात आहे. 

विरोध..

शिवसेना एकना शिंदे गटाचे नेते माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या दर्यापुरातील उमेदवारीला राणा यांनी विरोध केला आहे. राणा या स्वत: दर्यापूर मतदारसंघासाठी इच्छुक असल्याची चर्चा अमरावतीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बाहेरचे पार्सल नको, कमळच हवे, असे सांगत माजी खासदार नवनीत राणा सध्या फिरत आहे. यातून त्यांनी अडसूळ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.

Navneet Rana : इम्तियाज यांनी केले ‘जलील’, म्हणाले तीला भुंकण्यासाठीच पाठवले

सगळं सत्तेसाठी

नवनीत राणा यांचा अडसूळ यांना होत असलेला विरोध स्वत:ला उमेदवारी मिळावी, यासाठी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या त्यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आगामी काळात दर्यापूर मतदारसंघाच्या दावेदारीवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या प्रत्येक नेत्याचा विरोध असतानाही भाजपनं सगळ्यांच्या नाकावर टिच्चून राणा यांना उमेदवारी दिली. त्याची फळंही भाजपला भोगावी लागत आहेत. कोणाशीही न पटणारे म्हणून रवि राणा आणि नवनीत राणा यांची अमरावतीच्या नेत्यांमध्ये ओळख आहे. नवनीत राणा यांना पराभूत केल्यानंतर आता महाविकास आघाडी व महायुतीमधील सगळेच रवी राणा यांना बडनेरा मतदारसंघातून पराभूत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अशातच लोकसभा निवडणुकीच्या काळात अडसुळांच्या घरी जाणाऱ्या राणा यांनी पुन्हा एकदा आपले रंग बदलले आहेत. आता राणा पुन्हा अडसुळांचे विमान ‘क्रॅश’ करण्यासाठी सरसावल्या आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दर्यापूर मतदारसंघावर दावा आहे. अडसूळ यांनी या मतदारसंघातून संधी मिळेल असे सांगण्यात येत आहे. परंतु माजी खासदार नवनीत राणा यांनी या मतदारसंघाच्या ‘एअरफिल्ड’ मध्ये घुसखोरी केली आहे. नवनीत राणा यांनी दर्यापुरातील एका कार्यक्रमात अडसूळ यांच्यावर थेट प्रहार केला.

मेळघाट आणि दर्यापुरात कमळाच्या चिन्हावर उभा असणारा उमेदवार असेल, असे म्हणत राणांनी अडसुळांना डिवचले. दर्यापूर मतदारसंघात राणांचे दौरेही वाढले आहेत. अडसूळ पितापुत्र आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद नवा नाही. एकमेकांवर अगदी जहरी टीका करण्यापासून कोर्टात खटला दाखल करण्यापर्यंत त्यांचा वाद विकोपाला गेला आहे. अडसुळांनी लोकसभा निवडणुकीत राणांना मदत केली. पण ही मदत राणांकडे पाहून नव्हती. राज्यपालपद मिळविण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं होतं.

पुन्हा आरोप

मतदारांनी राणाा यांना नाकारलं. त्यानंतर पराभवात आनंदराव अडसूळ यांचा हात असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. अडसूळ यांनी आपल्याला ‘ब्लॅकमेल’ केले. जात पडताळणी प्रकरणात आपल्याकडे पैशांचीही मागणी केली, असे अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत. लोकसभा निवडणुकीसाठी आनंदराव अडसूळही इच्छुक होते. मात्र भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अडसुळांची नाराजी वाढत गेली. राणा विरुद्ध अडसूळ असा सामना आता पुन्हा दिसत आहे. अनेकवेळा दोघांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता दर्यापुरातही हा कलगीतुरा रंगणार आहे.

Buldhana NCP : दादांच्या आमदाराकडून लपत सुप्रियाताईंची भेट

शिवसेनेचा गड

2009 मध्ये मतदारसंघांची फेररचना झाली. त्यावेळी दर्यापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव झाला. शिवसेनेचे अभिजित अडसूळ हे दर्यापुरातून विजयी झाले होते. त्यामुळे दर्यापूर शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेचे एकमेकांच्या विरोधात काम केले. त्यामुळे दर्यापूरची जागा शिवसेनेने गमाविली. भाजपचे रमेश बुंदिले आमदार झालेत. आता या मतदारसंघातील काँगेस आमदार बळवंत वानखडे हे खासदार झाले आहेत. त्यामुळे दर्यापुरात आता कोण जिंकणार याची उत्सुकता आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!