महाराष्ट्र

PM Naredra Modi : नरेंद्र मोदींचीही ईडी कार्यालयात झाली होती 9 तास चौकशी

Arvind kejriwal : केजरीवालच्या अटकेनंतर विरोधकांचे टीकास्त्र

Delhi politics : दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi Chief Minister Arvind Kejriwal ) अरविंद केजरीवाल यांच्या घरी तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर एका प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्र्याला चौकशी सुरु असतानाच अचानक अटक करणे कायद्याला धरुन नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. याचेच उत्तर म्हणून भाजपा खासदाराने मोदींची ईडी (ED) चौकशी झालेली तेव्हाची परिस्थिती आणि किस्सा सांगितला आहे.

काय सांगितले गोपाळ शेट्टी यांनी?

उत्तर मुंबई मतदारसंघाचे विद्यामान खासदार गोपाळ शेट्टी (BJP Leader Gopal Shetty ) यांनी मोदींची ईडीकडून चौकशी झाली होती असे सांगितले. मोदींना अटकेची भीती नसल्याने ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. विरोधकांनी खरे काही केले नसेल तर त्यांना चौकशीला सामोरे जाण्यात काय अडचण आहे? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

“पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांना 9 तास ईडी कार्यालयात बसवून ठवले. 9 तासाच्या चौकशी दरम्यान त्यांनी सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली होती. माध्यमे ही बातमी आता दाखवत नाहीत. मात्र हे सत्य आहे. विरोधक काहीही बोलले तरी त्याला फारसे महत्त्व नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. देशाच्या संविधानाने हे अनेकदा दाखवून दिले आहे. भविष्यात सर्वांवर संविधानाचा धाक राहिला पाहिजे. मी आमदार, खासदार, मुख्यमंत्री असल्याने वाटेल ते करेन. मला कोणीही काहीही विचारणार नाही असे उद्या कोणीही म्हणू शकते. असे झाल्यास कायदा फक्त गरिबांसाठी आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो,” असेही शेट्टी यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!