NCP Vs BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख हे सातत्याने आपल्याकडे पुराव्यांचा पेनड्राइव्ह असल्याचा दावा करीत आहे. देशमुख यांच्या या दाव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी ‘ओपन चॅलेंज’ दिले आहे. देशमुख यांच्याकडे पेनड्राइव्ह असेल तर त्यांनी आता तो दाखवावाच असे आव्हान महाजन यांनी दिले आहे. सुमारे तीन वर्षांनंतर मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. देशमुख यांनी अलीकडेच या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांना भाजपला अटक करायची होती. त्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आपल्यावर दबाव होता. देवेंद्र फडणवीस यांनी हा दबाव आणल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.
देशमुखांच्या या आरोप नंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, डॉ. परिणय फुके आदींनी देशमुख यांना आव्हान दिले. आता यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनीही भाष्य केले आहे. शनिवारी (ता. 3) याप्रकरणातील वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी देशमुखांवर नवीन आरोप केले. त्यांनतर देशमुख यांनी वाझे यांच्यासंदर्भात न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षणाची कागदपत्र नागपुरात (Nagpur) प्रसार माध्यमांपुढे दाखविली. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशात महाजन यांनी देशमुखांना आव्हान दिले आहे.
बेछूट आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख बेछूट आरोप करीत आहेत. त्यांच्याकडे पेनड्राइव्ह आहे असा दावा आहे. तुमच्याकडे असा पेनड्राइव्ह असेल तर तर तो दाखवाच असे आव्हान महाजन यांनी दिले. देशमुख हे स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत असल्याचा दावा देखील महाजन यांनी केला आहे. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सचिन वाझे यांनी हा दावा केला आहे. वाझे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सर्व माहिती दिली. यासंदर्भात वाझे माध्यमांशी बोलले.
Congress : देशमुख आणि मानवांनी फडणवीसांचा बुरखा फाडल्यानंतर..
चौकशी करायला हवी
वाझे यांच्या कोणत्याच वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर देखील त्याला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस आरोप करीत असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. दोन खुनाच्या गुन्ह्यात त्यांना अटक झाली होती. खुनाच्या गुन्ह्यातील अटकेत असलेला व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखा नसल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यालाही महाजन यांनी उत्तर दिले. फडणवीस यांना दिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचे देखील नाव आहे. पत्रात जयंत पाटील यांचे नाव असले तर या प्रकरणाची देखील चौकशी करायला हवी, असे गिरीश महाजन म्हणाले.