महाराष्ट्र

Congress Politics : भाजपचे नेत्याची आता काँग्रेसमध्ये घरवापसी!

BJP : धृपदराव सावळे यांना मुकुल वासनिक यांची ‘एनओसी’

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे हे आज स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते. राजकीय स्वार्थासाठी भाजपामध्ये गेले होते. आता पुन्हा काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी अनेक महिन्यांपासून ते धडपडत होते. यासाठी मुकुल वासनिक यांची ‘एनओसी’ मिळाल्यानंतर आज ते घर वापसी करणार असल्याचे समजते.

माजी आमदार धृपदराव सावळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एक मुरब्बी व जनाधार असलेले नेते म्हणून परिचित आहेत. सरपंच ते आमदार व्हाया जिल्हा परिषद अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघ, चिखली विधानसभा मतदारसंघ तसेच मलकापूर विधानसभा मतदार संघावर त्यांचा मोठा प्रभाव आहे.

दरम्यान, धृपदराव सावळे यांनी काँग्रेसमधून २१ ऑगस्ट २०१५ रोजी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांच्यासोबत ११ कार्यकर्तेही भाजपवासी झाले होते. दरम्यान, काही दिवसांपासून ‘गड्या आपला गावच बरा’ असा विचार करून धृपदराव सावळे यांना घर वापसीचे म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे वेध लागले होते.

धृपदराव सावळे यांनी वाढदिवसानिमित्त खासदार मुकुल वासनिक यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, आता मुंबई येथे एका कार्यक्रमात धृपदराव सावळे काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू आहे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धृदपराव सावळे भाजपाची साथ सोडणार असल्यामुळे भाजपासह युतीला मोठा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस प्रवेशाने धृपदराव सावळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन जिल्ह्यातील राजकारणाला नवीन वळण मिळणार आहे.

Nitin Gadkari : गोविंददेव गिरी महाराज काय म्हणाले गडकरींना?

काँग्रेसलाच हात दाखवला! 

बंडखोरी नसानसात भिनलेल्या या नेत्याने कधीकधी वासनिकांनाही जुमानले नाही. नारायण राणे यांच्या स्टाईलने राजकारण करण्यावर त्यांचा भर राहिला. काँग्रेसने आमदारकी, जि.प. अध्यक्षपद, दोन वेळा विधानसभेची उमेदवारी, एसटी महामंडळाचे संचालक असे सर्व काही दिले. पण तरीही ते शांत राहिले नाहीत.

पुरे झाले आता

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात आल्यानंतर राज्यातही भाजपचा दबदबा वाढला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. रावसाहेब दानवेंच्या कृपेने थेट जिल्हाध्यक्ष देखील झाले. मात्र भाजप म्हणजे काही काँग्रेस नाही याचा प्रत्यय आला. खासदारकी तर सोडा, आमदारकीच्या उमेदवारीनेही हुलकावणी दिली. ‘आता पुरे झाले मंडळी’ असे म्हणत ते काँग्रेसमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!