विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात एकनाथ खडसे यांनी नवा दावा केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल बनविण्याचे आश्वासन दिले होते, असे एकनाथ खडसे यांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील अंतर्गत मतभेदाची सर्वांना जाणीव आहे. अशात एकनाथ खडसेंनी समाज माध्यमांची संवाद साधताना हा मोठा दावा केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मला भेटण्यासाठी बोलावले होते. आमची भेट झाली तेव्हा आमच्या दोघांशिवाय त्या ठिकाणी कोणीच नव्हत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला की, नाथाभाऊ मी तुमची राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी त्यांना म्हणालो की, देवेंद्रजी मी राज्यपाल झालो तर अतिशय आनंदाचीच बाब आहे. पण माझा यावर अजिबात विश्वास बसत नाही. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेतो आणि तुम्हाला शब्द देतो की, तुमची राज्यपाल पदासाठी शिफारस करणार. त्यानंतर पुढे काय घडले ते मला मला ठाऊक नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मला 2019 मध्ये असा शब्द दिला होता.
लोकसभा निवडणुकीदरम्यान एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी बातमी राजकीय वर्तुळात सर्वत्र पसरली होती. परंतु अजूनही खडसे यांचा भाजपात प्रवेश झालेला नाही. या मुद्द्यावर एकनाथ खडसे म्हणाले की, ज्यावेळी मी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजपात जाण्याची माझी इच्छाच नव्हती. राजधानी दिल्लीतून मला एका अतिज्येष्ठ नेत्यांनी फोन आला होता. दिल्लीमध्ये असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत माझामाझा भाजप प्रवेश झाला होता. त्यावेळी रक्षा खडसे देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. माझ्या गळ्यात रक्षा खडसे यांनीच भाजपचा मफलर घातला होता. या गोष्टीला 5 ते 6 महीने झाले आहेत. परंतु भाजपने अद्यापही माझ्या पक्षप्रवेशाची घोषणा केली नाही. त्यामुळे आता मी भाजप पक्षाच्या वाटेला जाणं टाळलं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले.
Arvind Kejriwal : 177 दिवसांनंतर केजरीवाल सुटले; अकोल्यात जल्लोष
माझ्यासाठी अपमानास्पद
समाज माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मी भाजपात प्रवेश घेत आहे, असे कधीही म्हणालोच नाही. उलट भाजपात प्रवेश घेण्यासाठी मला सांगण्यात आले होते. त्यानंतरच मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली होती. मी 40 वर्ष भाजपमध्ये कार्यरत असताना महाराष्ट्र पिंजून काढला आहे. सायकलवर फिरलो आहे. भाजपसाठी इतके सगळे काम करूनही, जर असे म्हणावे लागत असेल की मला भाजपमध्ये प्रवेश द्या, हे माझ्यासाठी अतिशय अपमानास्पद आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.