Uddhav Thackeray : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशात भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची हातापाया पडत आहेत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी मागणी शिवसेना करीत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला. भविष्यात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला देखील सोडतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपुढे हात जोडत आहेत. आता शरद पवारांनाही उद्धव ठाकरे यांचा कंटाळा यायला लागला आहे. शरद पवार यांनी आपल्याला मुख्यमंत्री केले नाही, असे उद्धव ठाकरे भविष्यात म्हणतील. काँग्रेसने दिल्लीतून ठाकरे यांना परतवून लावले. खासदार संजय राऊत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवा, असे म्हणत आहेत. परंतु उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कधीही स्वीकारणार नाही.
शरद पवारांना सुप्रिया सुळे (Supriya Sule), नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी भाजपला सोडले. उद्धव ठाकरे भविष्यात महाविकास आघाडीलाही सोडतील. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. यासाठी त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. मागील काही काळात अनेक नेत्यांना मराठा आंदोलकांनी रस्त्यात अडविले. त्यामुळे केंद्र सरकारने ही सुरक्षा कारण किल्ल्याची बावनकुळे यांनी सांगितले.
राजकारण नको
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाली की, बदलापूर येथील येथील अत्याचाराची घटना निषेधात्मक आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही, अशी घटना घडली आहे. महायुती सरकारने लक्षात आल्यानंतर आरती सिंग यांच्यासारखे अधिकारी नेमले आहेत. पण, महाविकास आघाडीचे नेते गलिच्छ राजकारण करत आहेत. विकृत मानसिकतेवर सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्राला मणिपूर बनविण्याचे प्रयत्न शरद पवार करत आहेत. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना, हिंगणघाट येथे मुलीला जाळून टाकले. पुणे, साकीनका, नांदेड अशा अनेक घटना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झाल्या आहेत. महाराष्ट्र पेटविण्याचं काम शरद पवार आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून सध्या सुरू आहे. मणिपूरसारखं महाराष्ट्र होईल, असे शरद पवार यांचे वक्तव्य होते. महाविकास आघाडीचे मनसुबे हे बदलापूर घटनेला धरून महाराष्ट्राला मणिपूर करायचे दिसत आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.