महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : शंभर दिवसांनी जनतेला हिशोब देणार

BJP Government : भाजपच्या सरकारबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान

Accountability Of Work : देशातील जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर विकासाला सुरुवात झाली आहे. मोदींनी पहिल्या 100 विकासाची कामे सुरू केली आहेत. तीन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले आहेत. कृषी उत्पादनावरील आधारभूत किंमत वाढवल्यामुळे 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे सध्या जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा लेखाजोखा घेऊन भाजप जनतेमध्ये जाणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते बुधवारी (ता. 18) नागपुरात बोलत होते. 

विकसित भारतासाठी काय संकल्प आहे, हे मांडत आहोत. पण विरोधक जनतेला भ्रमित करीत आहेत. त्यामुळे केलेल्या कामांचा दर 100 दिवसांनी आम्ही जनतेला हिशोब देणार आहोत, असेही बावनकुळे म्हणाले. नंदुरबार, गडचिरोली अशा आदिवासी जिल्ह्यातील जनतेला भुलविण्याचा विरोधकांनी पूर्ण प्रयत्न केला. पण आम्ही त्यांना आमच्याकडे वळवून घेऊ. महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी नियोजन तयार आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन जनतेपुढे जाणार आहोत. केंद्रातील सरकार 2029 पर्यंत राहणार आहे. पंतप्रधान विकासासाठी आग्रही आहेत.

डबल इंजिनचा फायदा

महायुती मतदारांना विनंती करणार आहे. 2029 पर्यंत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार राहणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले तर केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकार असेल. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. मोठ्या प्रमाणावर निधी मिळेल. त्यातून महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे भले होईल. आदिवासी भागांच्या विकासासाठी पूर्वी कमी निधी मिळायचा. मात्र आता सर्वाधिक निधी आदिवासी भागांसाठी देण्यात येत असल्याचेही, बावनकुळे म्हणाले.

अमरावतीचे राज्यसभा (Rajya Sabha) खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही. पण राहुल गांधींनी सुद्धा सांभाळून बोलले पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले. रामदास आठवले समजूनच बोलले असतील. राहुल गांधी विदेशात जाऊन देशाबद्दल काहीही बोलतात. त्यामुळे राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द केला पाहिजे, असं ते बोलले असतील, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हा प्रश्न नाही. केंद्र सरकारसोबत मिळून महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे कल्याण करणारे सरकार महाराष्ट्रात पाहिजे आहे. त्यासाठी प्रयत्न हवे असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस आरक्षणविरोधी

राहुल गांधी हे परदेशात जाऊन देशाला बदनाम करीत आहेत. राहुल गांधी यांना कोणताही धोका नाही. त्यांना सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार सक्षम आहे. काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरू यांनी नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध केला. आरक्षण विकासाला बाधक असल्याचे नेहरू म्हणाले होते. राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनीही आरक्षणविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस सुरुवातीपासूनच आरक्षण विरोधी आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी असेही ते म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!