महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : भ्रष्टाचार बाहेर येण्याच्या भीतीने आरोप 

BJP On NCP : चंद्रशेखर बावनकुळे यांचे टिकास्त्र 

Defended Devendra Fadnavis : कोणतीही तक्रार 24 तासात दाखल करावी लागते. मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख इतके हतबल कसे असू शकतात. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहिल्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढतील. त्यामुळे त्यांना थांबण्यासाठी काम सुरू आहे. समाजात विभागणी करुन महाराष्ट्राला असुरक्षित करण्याचे काम इंडिया आघाडीचे लोक करत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नागपुरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत कळले की, मोदींना मत नाही दिले तर पाकिस्तानचे झेंडे रॅलीमध्ये कसे फडकातात. याबद्दल जनजागृत झाली आहे. एकटे श्याम मानव आरोप करत नाही. त्यांनी 68 लोकांची टीम तयार केली आहे. टीका करण्यासाठी जहरी टीम तयार केली आहे.

सामाजिक स्वास्थ बिघडवून समाजात वाद निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीने वेगवेगळे सेंटर निर्माण केले आहे. वेळ आल्यावर त्यांची नावे जाहीर करू, असेही बावनकुळे म्हणाले. यांना महाविकास आघाडीला सत्ता देऊन पाकिस्तानचे झेंडे फडकायचे आहे, असे ते म्हणाले.

योजना बंद पडतील 

महायुती सरकारने महाराष्ट्राला कुठेही मागे ठेवले नाही. उलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मोदींनी कितीतरी योजना राज्याला दिल्या. मात्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) योजना बंद पाडायचे काम केले. एकनाथ शिंदेंनी त्या योजना पुन्हा सुरू केल्या आहेत. यांनी खटाखट पैसे देण्याचे आश्र्वासन दिले. मात्र आमचे सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमांतून पटापट काम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे लोक पिसाळले आहेत. विदर्भात आणि नागपुरमध्ये ज्या लोकांचा पिकाचे नुकसान झाले, त्यांना भरपाई मिळावी यासाठी आपण दौरा करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil : भाजप सत्तेत नकोच!

पुण्याच्या पावसाच्या परिस्थितीवर पालकमंत्री अजित पवार लक्ष ठेवून आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टी झाली आहे. सर्व नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. सरकार पूरग्रस्त लोकांच्या पाठीशी आहे. सरकारने आजपर्यंत कोणालाही वाऱ्यावर सोडलेले नाही. आताही सोडणार नाही, असे ते म्हणाले.

काँग्रेससारखा नाटक (नौटंकी) करणारा पक्ष आजपर्यत बघितला नाही. जसा रंगमंचावर नाच्या असतो तशी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेमुळे सध्या महाविकास आघाडी रडकुंडीला आली आहे, असे बावनकुळे म्हणाले.

चांगल्या काही योजना आणल्या तर त्याला विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम झाले आहे. काँग्रेसच्या काळात जी कामे झाली नाही ती सर्व कामे केंद्र व राज्य सरकार आता पूर्ण करत आहे. काँग्रेसचे अर्थसंकल्पाविरोधातील आंदोलन चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांना अर्थसंकल्प समजत नाही हे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावर सामनातून केलेल्या टीकेला काहीच अर्थ नाही, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!